Mayawati : कॉँग्रेस व भाजपच्या ‘करनी-कथनी’त फरक; ‘बसप’ नेत्या मायावती यांची टीका

बसपच्या पूर्व विदर्भातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मायावती यांची बेझनबाग मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली.
Mayawati
Mayawatisakal
Updated on

नागपूर - संविधानाच्या नावावर आज मते मागणाऱ्या काँग्रेसने संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हयात असताना भारतरत्न पुरस्कार दिला नाही तर आता भाजप दलितांचे आरक्षण संपुष्टात आणत असल्याचे सांगून बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी काँग्रेस आणि भाजप यांच्या कथनी आणि करनीमध्ये फरक असल्याचा आरोप केला.

बसपच्या पूर्व विदर्भातील उमेदवारांच्या प्रचारासाठी मायावती यांची बेझनबाग मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजप एकाच नाण्याचा दोन बाजू असल्याचे सांगून बसपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

देशाच्या स्वातंत्र्यापासून सर्वाधिक काळ केंद्रात काँग्रेस सत्तेवर होती. मात्र त्यांना बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, असे वाटले नाही. बसपचे संस्थापक कांशीराम यांच्या मृत्यूनंतर दुखवटा जाहीर करण्याचे सौजन्यसुद्धा काँग्रेसने दाखवले नाही. काँग्रेसने सत्तेवर असताना मंडल आयोग लागू केला असता आणि दलित, शोषित व गरिबांना त्यांचा हक्क व लाभ लाभ दिला असता बहुजन समाज पक्षाची स्थापना करण्याची गरजच भासली नसती, असेही मायावती यावेळी म्हणाल्या.

भाजपच्या गॅरंटीला भुलू नका

‘भाजपचे धोरण जातिवादी आणि भांडवलवादी आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजप कोणासाठी काम करीत आहे, हे उघडकीस आले आहे. निवडणुकीत फक्त आमिष दाखवण्याचे काम भाजप करीत आहे. खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपुष्टात आणले जात आहे. भाजपने दिलेल्या गॅरंटीला आता भुलू नका,’ असे आवाहनही मायावती यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.