Agriculture Policy : पंतप्रधान मोदींना काँग्रेसचे १० प्रश्न,शेतकऱ्यांच्या धोरणांची अंमलबजावणी कधी?

Agriculture Policy : काँग्रेसने विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, आणि अपूर्ण विकासकामे यावर पंतप्रधान मोदींना १० प्रश्न विचारले आहेत. त्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे.
Agriculture Policy
Agriculture PolicySakal
Updated on

नागपूर : विदर्भात २०२३ मध्ये १,४३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अमरावती ८ महिन्यांत आत्महत्यांचे केंद्र ठरले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांकडे इतके दुर्लक्ष का?. कापूस, सोयाबीन, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आयात -निर्यात नियम आणि हमीभाव यासारख्या न्याय धोरणांची अंमलबजावणी कधी करणार? असा प्रश्न काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

पंतप्रधान मोदी शुक्रवारी वर्धा दौऱ्यावर अर्थात विदर्भात येत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून विदर्भाशी संबंधित १० प्रश्न विचारण्यात आले असून पंतप्रधानांनी त्यांची उत्तरे द्यावी, असे आव्हान काँग्रेसने दिले आहे.

शेतकऱ्यांच्या धोरणांची अंमलबजावणी कधी?

पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीही विदर्भात सभा घेतल्या. पण, मतदारांचा त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. नागपूरसह विविध ठिकाणी पूलं कोसळण्याच्या घटनांची चौकशी व्हावी. लाडकी बहीण योजना आजही महिलांना निवडणुकीपूर्वीचे लॉलीपॉप वाटते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास अधिक चांगल्या योजना राबवू, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार अभिजित वंजारी, संजय महाकाळकर, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.

असे आहेत प्रश्न...

  1. १८ हजार कोटींचा बुटीबोरीतील सोलर पॅनल प्रकल्प गुजरातमध्ये हलविण्यात आला. त्यामुळे ३००० युवक रोजगारापासून वंचित झाले. एमआयडीसीची अवस्था बिकट असून एमएसएमईसाठीही आधार नाही, इथल्या तरुणांची बेरोजगारीतून सुटका कशी होणार?

  2. नागपुरात ९ वर्षीय मुलीवर तिच्या ५ वर्षांच्या बहिणीसमोर अत्याचार झाला. अद्याप आरोपीला अटक नाही. २०२३ मध्ये २४७ प्रकरणे समोर आली. लाकडी बहिणीला संरक्षण कसे देणार?

  3. दुष्काळमुक्तीच्या आश्वासनानंतरही विदर्भातील ४५ सिंचन प्रकल्प अपूर्णच आहेत, शेतकऱ्यांना अजून किती काळ त्रास सहन करायला लावणार?

  4. गडचिरोलीतील पालकांना मृत मुलांचे कलेवर खांद्यावर घेऊन १५ किमी पायपीट करावी लागली, अमरावतीत गर्भवती महिलेचा रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेतच मृत्यू झाला. हाच सबका साथ, सबका विकास आहे का?

  5. अकोल्यातील ३७३ गावे खारट पाण्यामुळे आरोग्याच्या प्रश्नांशी तोंड देत आहेत, तुमचे सरकार त्याकडे दुर्लक्ष का करतेय?

  6. ५५ हजार कोटींतून तयार झालेल्या समृद्धी महामार्गाला तडे गेले असून हा मृत्यूचा महामार्ग ठरला आहे, विकसित भारताच्या शायनिंग स्टारची अशी अवस्था का?

  7. नागपूर मेट्रोच्या उद्‍घाटनाला १० वर्षे लोटली तरी प्रकल्प अजूनही अपूर्णच आहे, कॅगने उघड केलेल्या भ्रष्टाचारात प्रकल्प अडकला आहे. सरकार प्रकल्प पूर्ण करण्यात अपयशी का ठरले?

  8. वर्धा येथील बजाज चौकातील रेल्वे पुलाचे काम ९ वर्षांनंतरही अपूर्णच आहे, युती सराकार केवळ खोटी आश्वासने, विलंब आणि भ्रष्टाचारासाठीच आहे का?

वाचाळविरांना भाजपचे अभय

कॉंग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संदर्भात भाजप नेत्यांचे बेताल वक्तव्य सुरूच आहे. पक्षाचे अभय असल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत नाही. भाजपच्या मनातील ओठावर आले असून ते दंगल भडकविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका विकास ठाकरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.