PM Narendra Modi Ramtek: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रामटेक दौऱ्यावर आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. रामटेकच्या पावन भूमिला माझा साष्टांग नमस्कार असे मोदी म्हणाले.
रामटेक आणि नागपूरसाठी नरेंद्र मोदी यांनी एकत्रीत सभा घेतली. १९ तारखेला सर्वात जास्त मतदान करण्याता संकल्प करा. पुन्हा एकदा मोदी सरकार, अशी घोषणा देखील मोदींनी दिली. रामटेकच्या कन्हामध्ये मोदी बोलत होते. फक्त तुम्हाला खासदार निवडायचा नाही तर विकसीत भारतासाठी मतदान करा, असे मोदी म्हणाले.
मीडियाच्या निवडणुकांच्या सर्व्हेतून एनडीएचा विजय दाखवत आहेत, असे देखील मोदींनी स्पष्ट केले. विरोधकांकडे आरोप करण्यासाठी नवीन मुद्दे नाहीत. संविधान धोक्यात असल्याचे खोटा प्रचार सुरु आहे. पाण्यात काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, असं मोदी म्हणाले.
गरीबाचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर म्हणतात लोकशाही धोक्यात आली. जेव्हा आणीबाणी लागू केली तेव्हा लोकशाही धोक्यात नव्हती का?, असा सवाल नरेंद्र मोदी यांनी केला. इंडिया आघाडीवाले गरीबांना कधीच पुढे जाऊ देत नाही. हे एकत्र झाले तर देशात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.
"...एनडीएचा बंपर विजय दाखविल्या गेलेल्या सर्वेक्षणांमध्ये दिसून येतो... जेव्हा मोदींना शिवीगाळ होऊ लागते तेव्हा तुम्ही 'फिर एक बार मोदी सरकार' समजून घ्या. माझ्या आईला शिव्या द्यायला सुरुवात करा किंवा माझ्या नंतरच्या वडिलांना 'फिर एक बार मोदी सरकार' समजले आणि जेव्हा ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले जातात तेव्हा तुम्ही 'फिर एक बार मोदी सरकार' समजून घ्या...", असं मोदी म्हणाले.
यावर्षी रामनवमीला श्रीराम टेन्टमध्ये नाही तर मंदिरात दर्शन देणार आहेत. एकजूट होऊन देशाच्या नावावर मतदान करा. विरोधकांनी राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण फेटाळला. हे लोक सनातन धर्मावर टीका करतात. सनातन संपवण्याची भाषा करतात. ते हिंदू धर्माची शक्ती संपवण्यासाठी प्रयत्न करतात.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांना मतदान म्हणजे विरोधकांना शिक्षा आहे. त्यांना पापाची शिक्षा मिळायला हवी. काँग्रेसने ओबीसी समाजाला मागे ठेवले. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारण संपवले. बाबासाहेबांना भारतरत्नापासून दूर ठेवले. अनुसूचित जाती जमातीला कट करुन दूर ठेवण्यात आलं, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.