Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

congress leader avinash pandey on rahul gandhi : काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती असल्याचा दावा केला आहे.
rahul gandhi
rahul gandhi
Updated on

काँग्रेसचे महासचिव अविनाश पांडे यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती असल्याचा दावा केला आहे. नागपुरात बोलताना पांडे यांनी राहुल गांधी यांच्यामध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा केला आहे. पांडे यांनी केलेले हे विधान सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आले आहे.

अविनाश पांडे यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात लोकसभेचे विरोधीपक्ष नेते आणि खासदार राहुल गांधी यांची जोरदार स्तुती केली. ही स्तुती करताना पांडे यांन राहुल गांधी यांची तुलना थेट देवाशी केली आहे. जोवर एखाद्या व्यक्तीत दैवी शक्ती असत नाही किंवा त्याच्यावर अदृश्य शक्तींचा प्रभाव असत नाही, तोपर्यंत कोणताही व्यक्ती दहा हजार किलोमीटरची पायी यात्रा करू शकत नाही, असे पांडे म्हणाले आहेत.

राहुल गांधी यांनी देशातील स्थिती पाहून थेट जनतेत जाण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. मात्र, असा निर्णय घेणं सोपं नाही. जोवर एखाद्या व्यक्तीत दैवी शक्ती असत नाही किंवा अदृश्य शक्तीचा प्रभाव नसतो. तोवर कोणताही व्यक्ती असे करू शकत नाही असा दावा देखील पांडे यांनी केला आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.

rahul gandhi
Nitin Gadkari : गडकरींनी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना का दिली होती गोळ्या घालण्याची धमकी? स्वतःच सांगितला किस्सा

राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, येत्या काही दिवसात या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. यादरम्यान राज्यात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांना उत आला आहे. काँग्रेसकडून विदर्भ आणि मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. काही दिवसांपू्र्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राहुल गांधी, हे दसऱ्यानंतर पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पुढच्या आठवड्यात राहुल गांधी यांचा नांदेड आणि चिमूर दौरा होणार आहे, तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी जाहीर सभा देखील होईल. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रावर काँग्रेसचं ‌विशेष लक्ष दिसून येत आहे.

rahul gandhi
Ratan Tata Health Update: रतन टाटांची तब्येत बिघडली? सोशल मिडियावर पोस्ट करून केला अफवेचा खुलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.