उमेदवार बदलल्याने काँग्रेसचे तीन नेते आले अडचणीत!

कॉंग्रेसने समर्थन दिले असले तरी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांची निवडून येण्याची शक्यता कमीच आहे
Congress
CongressCongress
Updated on

नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीच्या (Legislative Council elections) ऐन तोंडावर उमेदवार बदलण्याची नामुष्की कॉंग्रेसवर (congress) ओढवली. छोटू भोयर निष्क्रिय असल्यामुळे उमेदवार बदलवणे कसे गरजेचे आहे, हे वरिष्ठांना पटवून देण्यात नागपूरचे नेते यशस्वी झाले. परंतु, या सर्व भानगडींत छोटू भोयर यांनी नाना पटोलेंसह (Nana Patole), पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) आणि ऊर्जामंत्री व जिल्‍ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना मात्र अडचणीत आणले. कारण, या निवडणुकीचे पडसाद भविष्यातही उमटत राहणार आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत छोटू भोयर यांची जबाबदारी घेतली होती. भोयर यांनी लढण्याची पूर्ण तयारी केली होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने वेगवान हालचाली केल्या. कुठलाही धोका पत्करायचा नाही म्हणून सर्व सदस्य मतदार सहलीला पाठवून चंद्रशेखर बावनकुळे निश्‍चिंत झाले. इकडे कॉंग्रेसच्या खेम्यात स्मशान शांतता होती. नेते थंड आणि उमेदवार त्याहीपेक्षा थंड, अशी स्थिती सुरुवातीच्या दिवसांत होती. त्यातच ऐन वेळेवर भाजपमधून भोयर यांना नाना पटोलेंनी आयात केल्याने कॉंग्रेसमधील कार्यकर्ते दुखावले होते आणि भोयरांच्या निष्क्रियतेने त्यात आणखी भर घातली.

Congress
अनुष्का सेन हिने शेअर केले बाथरूमचे फोटो; वय फक्त १९ वर्ष

कॉंग्रेसचे नेते नाना पटोले, सुनील केदार, नितीन राऊत, विकास ठाकरे यांनी अखेरच्या तीन दिवसांत शहरातील हॉटेल रॅडीसन ब्लू, हॉटेल तुली इंटरनॅशनल येथे बैठकांचा सपाटा लावला. इकडे माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या खोडसाळ आहेत, उमेदवार बदलला जाणार नाही, आपणच निवडणूक लढू आणि विजयी होऊ, असा विश्‍वास छोटू भोयर व्यक्त करत राहिले.

परंतु, मतदानाच्या आदल्या रात्री भोयर निवडून येणार नाहीत आणि आपण तोंडघशी पडू, हे कॉंग्रेस श्रेष्ठींना पटवून देण्यात आले. सायंकाळी प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या सहीचे पत्र व्हॉट्सॲपवर फिरू लागले. तेव्हा कॉंग्रेसने खरोखरच उमेदवार बदलला, माध्यमांच्या बातम्या खोट्या नव्हत्या, यावर शिक्कामोर्तब झाले आणि कॉंग्रेस नेते तोंडघशी पडले.

कुणी केला कुणाचा गेम?

कट्टर स्वयंसेवक आणि भाजपचे निष्ठावान छोटू भोयर यांना फोडून कॉंग्रेसमध्ये आणल्याचा आनंद नेते साजरा करीत होते. तेव्हा भोयर हे स्लिपर सेल’ आहेत. ते कॉंग्रेसमध्ये आले नाहीत, तर त्यांना पाठवण्यात आले आहे, असे बोलले जात होते. पुढे त्यांची निष्क्रियता बघून कॉंग्रेस नेत्यांनाही ते उमगू लागले. त्यानंतर नेत्यांनी वेगवान हालचाली सुरू केल्या. तेव्हा छोटू भोयर यांनी कॉंग्रेसचा ‘गेम’ केला, असे बोलले जात होते. परंतु, उमेदवार बदलवून कॉंग्रेसनेच छोटू भोयर यांचा गेम करून टाकला. पण या सर्व भानगडींत दोघेही तोंडघशी पडले आणि शिस्तबद्ध म्हणून ओळख असलेल्या भाजपमधील शिस्त पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

राजकीय कारकीर्द संपल्यात जमा

कॉंग्रेसने समर्थन दिले असले तरी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांची निवडून येण्याची शक्यता कमीच आहे. त्‍यामुळे एकमेकांचा गेम गेल्याचे समाधान भोयर आणि कॉंग्रेस नेत्यांमध्ये असू शकते. पण ३४ वर्ष भाजपशी निष्ठावान असलेल्या छोटू भोयर यांना आता भाजप पुन्हा जवळ करेल, असे वाटत नाही. उमेदवार बदलून कॉंग्रेसने त्यांना दूर सारलेच आहे. त्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे, असे राजकीय जाणकार सांगतात.

Congress
‘पहाट’ शपथेचा परिणाम; शिवसेना-काँग्रेस एकाच पंक्तीत

बिनविरोध करण्यासाठी दिला होता नकार?

निवडणुकीत गांधीजींचे विचार चालत नाहीत, तर गांधीजींचे दर्शन मतदारांना घडवावे लागले. पैसा मोठ्या प्रमाणात चालतो, असे नेहमीच बोलले जाते. निवडून येण्याइतकी मते कॉंग्रेसकडे नव्हती. त्यामुळे ही निवडणूक न लढता बिनविरोध करावी, असेही कॉंग्रेसमधील काहींचे म्हणणे होते. छोटू भोयर यांनी ‘मॅनेज’ व्हावे, असे त्यांना सांगण्यात आले होते, अशी माहिती आहे. पण ‘भाजपमध्ये अन्याय झाल्यामुळे मी इकडे आलो, ते मॅनेज होण्यासाठी नाही, तर लढण्यासाठी..’ असे सांगत भोयर यांनी लढण्याची ‘पूर्ण’ तयारी दर्शविली. भाजपचे १००च्या जवळपास सदस्य आपल्यासोबत येतील, असा त्यांचा दावा होता. पण भाजपचे सर्व सदस्य मतदार पक्षाने सहलीला पाठवल्यानंतर ती शक्यता मावळली. भाजपचे सदस्य आपल्यासोबत न आल्यास जिंकणे अवघड आहे, हे भोयर यांच्या लक्षात आले. त्यामुळे विनाकारण ‘शक्ती’ खर्च करण्यात काही अर्थ नाही, असे समजून त्यांनी तलवार म्यान केल्याचेही राजकीय जाणकार सांगतात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()