काँग्रेसवर काय वेळ आली! गर्दी जमवण्यासाठी महिलांना दिले १०० रुपयांचे कुपन

Congress Party
Congress Partyesakal
Updated on

नागपूर : नागपुरात भाजप नगरसेवक सतीश होले (Satish Hole) यांनी मंगळवारी (ता. २२) काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम संपल्यावरही उपस्थित महिला जाण्याचे नाव घेत नव्हत्या. एका महिलेला विचारल्यावर आयोजकांनी कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी शंभर रुपये देणार असल्याचे सांगितले. मात्र, पैसे अद्याप न मिळाल्याने आम्ही थांबल्याचे सांगितले.

याचे फुटेज घेत असताना कार्यकर्त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना हटकले. याबाबत विचारले असता ‘आम्ही नाश्त्याचे कुपन’ देत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र, महिलेने हे कुपन शंभर रुपयांचे असून, पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन घ्यायचे आहेत, असे सांगितले. मूळचे काँग्रेसचे (Congress) असलेले नगरसेवक सतीश होले (Satish Hole) यांनी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर भाजपने त्यांना निलंबित केले होते.

Congress Party
जोडप्याने केले दोनदा लग्न अन् घेतला दोनदा घटस्फोट; जाणून घ्या
भाजपचे नगरसेवक काँग्रेसमध्ये (Congress) येणार असल्याने हा कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमाला गेलो होतो. परंतु, कुठून कोणाला आणले माहिती नाही. हा काँग्रेसचा (Congress) कार्यक्रम नव्हता. भाजपचा नगरसेवक काँग्रेसमध्ये येणार होता. त्याने हा कार्यक्रम ठेवला होता. म्हणून आम्ही तिथे गेलो होतो.
- विकास ठाकरे, आमदार, काँग्रेस
खोटेपणा हेच काँग्रेसचे दुसरे नाव आहे. काही असो खोटं बोलायचं अन् रेटून बोलायचं. काहीतरी करून वेळ मारून न्यायची ही काँग्रेसची शैली आहे. काँग्रेसला जनमानसात स्थान नाही. यामुळेच पैसे गोळा करून लोक आणावी लागतात. हे दुर्दैवी सत्य आहे. तुमच्या व्यासपीठावर झाले हे तुम्ही स्वीकारले पाहिजे. मात्र, ते स्वीकारत नाही.
- केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.