काँग्रेस आज फुंकणार परिवर्तनाचा बिगुल! स्थापनादिनी महारॅली, भाजपशी दोन हात करण्यासाठी ‘हम हैं तैयार’

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ठोकला शड्डू! भाजपला आव्हान देण्यासाठी नागपुरात आज महारॅली
काँग्रेस आज फुंकणार परिवर्तनाचा बिगुल! स्थापनादिनी महारॅली, भाजपशी दोन हात करण्यासाठी ‘हम हैं तैयार’
Updated on

Nagpur Congress Maha Rally: भाजपच्या जुलमी, अत्याचारी व अहंकारी सरकारला घरी बसवण्यासाठी काँग्रेस ‘तैयार’ असून उद्या गुरुवारी (ता.२८) नागपूरमध्ये होणाऱ्या महारॅलीमधून परिवर्तनाचा संदेश दिला जाणार आहे. उमरेड मार्गावरील मैदानात दिघोरी नाक्याजवळ सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

सभा स्थळाला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव देण्यात आले आहे. महामेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून देशभरातील काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरमधून परिवर्तनाचा संदेश दिला जाणार आहे. मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, यापूर्वीही देशावर जेव्हा संकट आले होते तेव्हा याच नागपूरच्या भूमीतून काँग्रेसने एल्गार पुकारला होता. आज लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आहेत. ही व्यवस्था अबाधित राखणे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. त्याकरिता काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापनदिनाचा भव्य सोहळा नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला असल्याचे पटोले यांनी सांगितले.(Latest Marathi News)

देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून काँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकत्र झाला होता. हजारो स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग व बलिदानाने जुलमी, अत्याचारी ब्रिटिशांना देश सोडण्यास भाग पाडले. स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. आज पुन्हा महाराष्ट्राच्या भूमीतून देश वाचवण्याच्या लढाईचा एल्गार पुकारला जात असल्याचे पटोले म्हणाले.

काँग्रेस आज फुंकणार परिवर्तनाचा बिगुल! स्थापनादिनी महारॅली, भाजपशी दोन हात करण्यासाठी ‘हम हैं तैयार’
Priyanka Gandhi: प्रियांका गांधींच्या अडचणी वाढणार! आर्थिक घोटाळ्याच्या चार्जशीटमध्ये ईडीनं दाखल केलं नाव

संविधानाची सुरक्षा हीच काँग्रेसची गॅरंटी

आज शेतकरी, कामगार, तरुणांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. सरकारी यंत्रणा वेठीस धरल्या जात आहेत. देश कठीण प्रसंगातून जात आहे. देशाला वाचण्यासाठी काँग्रेसची ही लढाई असून हीच काँग्रेसची गॅरंटी आहे. या परिवर्तनासाठी ‘हम तैयार है’, असे नाना पटोले म्हणाले. (Latest Marathi News)

‘डरो मत’

ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. त्यांना घाबरविले जात आहे. संसद सुरक्षेवर प्रश्न विचारले म्हणून १५० खासदारांना निलंबित केले. जगातील बलाढ्य ब्रिटिशांना जसे देश सोडून जाण्यास भाग पाडले तसेच या हुकूमशाही भाजपलाही घरी बसवू. राहुल गांधी यांनी ‘डरो मत’चा नारा दिला आहे. त्याच मार्गाने जाऊन भाजपला सत्तेतून खाली खेचू, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस आज फुंकणार परिवर्तनाचा बिगुल! स्थापनादिनी महारॅली, भाजपशी दोन हात करण्यासाठी ‘हम हैं तैयार’
Bachchu Kadu: बच्चू कडू मविआच्या वाटेवर? एकनाथ शिंदेंचं नाव घेत म्हणाले, 'मुख्यमंत्रीपदी शिंदे आहेत तोवर....'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.