Nagpur Crime : ३०० कोटींच्या संपत्ती मिळविण्यासाठी एक कोटी देऊन रचला अपघाताचा कट

घातपात असल्याच्या शंकेवरून पोलिसांनी गुन्हे शाखेच्या माध्यमातून तपास सुरू केला.
conspiracy of accident by paying one crore to get wealth of 300 crores
conspiracy of accident by paying one crore to get wealth of 300 croresSakal
Updated on

Nagpur News : ३०० कोटींच्या संपत्ती मिळविण्याच्या उद्देशाने गडचिरोलीच्या नगररचना विभागाची सहाय्यक संचालक व मृतक पुरुषोत्तम पुट्टेवार (वय ८२) यांच्या खुनासाठी अर्चना यांनी एक कोटी रुपयाची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फरार असलेल्या सार्थक बागडेला अटक केली आहे.

सध्या नीरज ईश्वर निमजे (वय ३०, रा. शक्तीमातानगर, खरबी रोड) व सचिन मोहन धार्मिक (वय २९ रा. बगडगंज) पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची १२ तारखेपर्यंत वाढीव कोठडी मिळविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मे रोजी पुरुषोत्तम पुट्टेवार यांना बालाजीनगरात कारने चिरडले होते. मात्र, याप्रकरणी घातपात असल्याच्या शंकेवरून पोलिसांनी गुन्हे शाखेच्या माध्यमातून तपास सुरू केला. सचिन, नीरज आणि सार्थक या तिघांनी घटनेपूर्वी कार खरेदी केल्याच्या सीसीटीव्ही फुटेजवरून सचिन आणि नीरजला अटक करण्यात आली.

त्यांनी या कटाचा मुख्य सूत्रधार अर्चना पुट्टेवार यांचे नाव समोर आले. दरम्यान तपासात अर्चनाने नातेवाइकांच्या मदतीने सार्थक व सचिनला पुरुषोत्तम यांना कारखाली चिरडून ठार मारण्यासाठी एक कोटीची सुपारी दिली.

सुरुवातीला दोघांना सुमारे १७ लाख रुपये देण्यात आले. यासह अर्चनाच्या नातेवाइकाने सचिनला बीअर बारसाठी जागा व परवाना देण्याचेही आश्वासन दिले होते. त्यामुळे सार्थक व सचिनने नीरज याला पुरुषोत्तम यांना ठार मारण्याच्या कटात सहभागी करून घेतले.

२२ मे रोजी पुरुषोत्तम यांना कारखाली चिरडण्याचा कट रचण्यात आला. तत्पूर्वी १८ मे रोजी अर्चना, सार्थक, सचिन व नीरजची एका ठिकाणी भेट झाली. घटनेच्या दिवशी कोण कुठे राहील याबाबत चौघांमध्ये चर्चा झाली.

या दिवशीचे फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान सार्थक हा फरार होता. त्याला पोलिसांनी सोमवारी अटक केली. तो घटनेनंतर वैष्णोवदेवीला दर्शनाला गेला. त्यामुळे त्याचे पोलिसांना लोकेशन मिळाले नाही. सोमवारी तो नागपुरात परतताच पोलिसांनी त्याला अटक केली.

जामीन मिळताच नीरजने पबमध्ये उधळले पैसे

बालाजीनगरातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघातात अजनी पोलिसांनी नीरजला अटक केली. याप्रकरणात त्याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर नीरज हा मित्रांसह सतत पबमध्ये जाऊ लागला. मित्रांना महागडी दारू पाजायला लागला. यावरून पोलिसांना संशय आला व गुन्हेशाखा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणात अनेक खुलासे झाले.

अर्चना पुट्टेवार कारागृहात

अर्चनाची पोलिस कोठडी संपल्याने पोलिसांनी रविवारी तिला न्यायालयात हजर केले. पोलिसांनी तिची पोलिस कोठडी मागितली नाही. त्यामुळे न्यायालयाने तिची न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात रवानगी केली. पोलिसांनी पोलिस कोठडी न मागितल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.