नागपूर : जिल्हा परिषद शाळांमध्ये कंत्राटी शिक्षण नेमण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. याला सर्वस्तरातून विरोध होत आहे. या निर्णयामुळे नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या साडेचारशे जागा कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० किंवा २० पेक्षा कमी पटाच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक अथवा डी.एड पदविका धारक बेरोजगार युवकांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याच्या राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून यापूर्वीच १५ मार्च रोजी संच मान्यतेबाबत सुधारित निकषाबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला होता.