नागरिकांना बेड आणि औषधं वेळेत मिळावेत म्हणून कंट्रोल रूम स्थापन

नागरिकांना बेड आणि औषधं वेळेत मिळावेत म्हणून कंट्रोल रूम स्थापन
PASIEKA
Updated on

नागपूर : कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये (Covid hospitals) ऑक्सिजन बेड (Oxygen Beds) जीवनावश्यक औषध (Medicines) तातडीने मिळावे याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench of Bombay High court) दिलेल्या आदेशानुसार, कंट्रोल रूमची स्थापन केली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी (Nagpur Collector) दिली. तसेच, नागपूरसह ग्रामीण भागातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येणार आहे, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. (Control room patients for getting oxygen beds and Medicines)

नागरिकांना बेड आणि औषधं वेळेत मिळावेत म्हणून कंट्रोल रूम स्थापन
'महाराष्ट्रात मराठा समाजावर अशी वेळ यावी हीच शोकांतिका; नागपुरातील मराठा समाज संयोजकांचं परखड मत

शपथपत्रानुसार, कंट्रोल रूममध्ये विविध प्रकारचे तीन चमू तैनात असणार आहे. या चमूच्या जवाबदारी निश्‍चित करण्यात आल्या आहेत. डॉक्टर्ससह १५ जणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच, मेडिकलच्या अधिष्ठातांनी अत्यावश्यक औषधांच्या गरजेसाठी संपर्क साधावा. यासाठी जिल्हाधिकारी प्रयत्न करतील, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. शासकीय व खासगी दवाखान्यांची संपर्कात राहून कंट्रोल रूममध्ये संपर्क केलेल्या गरजूंना या बाबी उपलब्ध करून देण्यात येतील. आयएमने रुग्णांच्या सेवेसाठी १४ डॉक्टर दिले आहेत. आएमआयचे तीन हजार सदस्य आहेत. तर, १ हजार डॉक्टर ज्येष्ठ नागरिक आहेत. यापैकी, १४ डॉक्‍टरांनी आपली सेवा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट -

ग्रामिण भागातील कामठी, नरखेड, भिवापूर, काटोल येथील १६ सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यात येत आहे. शालिनीताई मेघे हॉस्पिटल वानाडोंगरी, लता मंगेशकर हॉस्पिटल डिगडोह हिंगणा रोड, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा आणि मुरे मेमोरिअल हॉस्पिटल नागपूर येथे नवीन ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी ७.२५ कोटी रुपये खर्च येणार असून सीएसआर निधीतून ही रक्कम मॉईल कडून मिळाली आहे.

नागरिकांना बेड आणि औषधं वेळेत मिळावेत म्हणून कंट्रोल रूम स्थापन
"आपल्या अपयशाचं खापर मागील सरकारवर फोडणं हेच राज्य सरकारचं काम"

मेडिकल मेयो एम्स येथे ऑक्सिजन प्लांट स्थापन करण्यासाठी ८ मेपासून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. वेकोलिकडून २ कोटी ५ लाख ५० हजार रुपये मिळाले आहेत. मेडीकल मेयो, एम्स या ठिकाणी स्वतंत्र ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्मितीसाठी राज्य सरकारने दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

(Control room patients for getting oxygen beds and Medicines)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.