नागपूर : जिल्ह्यात कोरोना (Corona)संक्रमणाचा वेग वाढत असून आता मृत्यूची नोंद दर दिवसाला होत आहे. मागील २४ तासांत ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून हे सर्वजण शहरातील आहेत. यामुळे आरोग्य प्रशासन आता पुरते हादरले आहे. तर नव्याने २ हजार २८५ जणांना कोरोनाने विळख्यात घेतले. जिल्हात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार १०७ झाली आहे.विशेष असे की, सहा दिवसांमध्ये ९ जण दगावले आहेत. यामुळे नागपुरकरांच्या चिंतेत भर पडली. (Nagpur Corona Updates)
तिसऱ्या लाटेत ओमिक्रॉनच्या संक्रमणाचा वेग वाढणार असल्याचे वर्तविण्यात आले. मात्र कोरोना संक्रमणाची गती प्रचंड वाढली आहे. २४ तासांत शहरात १ हजार ७२२ तर ग्रामीण भागात ४८६, जिल्ह्याबाहेरील ७७ अशा एकूण जिल्ह्यात २ हजार २८५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शहरातील प्रयोगशाळांमधून पुढे आला. आतापर्यंत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख ५२ हजार ७५८, ग्रामीण १ लाख ४८ हजार ७७५, जिल्ह्याबाहेरील ७ हजार ५३९ अशी एकूण ५ लाख ९ हजार ७२ झाली आहे. महिनाभरापूर्वी दिवसभरात दोन हजार चाचणी होत होत्या, परंतु कोरोना चाचण्यांची गती प्रशासनाने वाढवली. दिवसभरात जिल्ह्यात ११ हजार ९२१ संशयितांनी चाचण्या केल्या. चाचण्या वाढल्या तशी बाधितांची संख्या वाढली असल्याचे चित्र दिसून आले.(Nagpur Corona News)
जिल्ह्यात तिसरी लाट जानेवारीदरम्यान सुरू झाली. मात्र १ जानेवारी २०२२ रोजी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. मात्र हा रुग्ण जिल्ह्याबाहेरून उपचाराला आला होता. त्यानंतर ११ जानेवारीला एका शहरातील रुग्ण दगावला. १३ जानेवारीला १, १४ जानेवारीला ३, १५ जानेवारीला १, १६ जानेवारीला ३ कोरोनाबाधित दगावले. यामुळे आतापर्यंत कोरोनाची मृत्यूसंख्या १० हजार १३२ वर पोहचली आहे. मृत्यू वाढत असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
कोरोनामुक्तांची संख्या वाढली
रविवारी जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा वाढला. शहरात दिवसभरात ७०९, ग्रामीणला ८०, जिल्ह्याबाहेरील १३० असे एकूण ९१९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे एकूण ५लाख ९ हजार कोरोनाबाधितांपैकी ४ लाख ८७ हजार ७६३ जणांनी कोरोनावर मात केली. आहे.
कोरोनाचे तिसऱ्या लाटेतील मृत्यू
१ जानेवारी १
११ जानेवारी १
१३ जानेवारी १
१४ जानेवारी ३
१५ जानेवारी १
१६ जानेवारी ३
तीन लाटेतील मृत्यू
शहर ५,९००
ग्रामीण २,६०४
जिल्ह्याबाहेरील १,६२८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.