Corona: कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! उपाययोजनांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

राज्यात सध्या ११ रुग्ण आढळून आले असून यांपैकी सर्वाधिक मुंबईत आहेत.
Eknath Shinde
Eknath Shinde
Updated on

नवी दिल्ली : देशभरात पुन्हा कोरोनाच्या व्हायरसनं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. सध्या देशभरात महाराष्ट्र, गोवा आणि केरळमध्ये नव्या व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली असून काल केरळमध्ये ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातही २७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातही राजधानी मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्याबाबतच्या उपयांबाबत महत्वाची माहिती दिली. नागपूर इथं अधिवेशन संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Corona is raising again in Maharashtra CM Eknath Shinde gave info about measures)

कोरोनाच्या उपाययोजनांबाबत दिली अपडेट

राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "कोरोना संदर्भात जे काही उपाय करायचे आहेत. आरोग्य यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत कुठल्याही परिस्थितीत त्याचा प्रसार वाढ होणार नाही याची काळजी सरकार घेईल" (Latest Marathi News)

Eknath Shinde
New Laws: गुन्हे करुन परदेशात लपलेल्या गुन्हेगारांविरोधात आता खटला चालणार; झटपट शिक्षाही होणार

राज्यात २७ रुग्णांची नोंद

दरम्यान, राज्याच्या आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत २७, पुण्यात २ आणि कोल्हापुरात कोरोनाचा एक सक्रिय रुग्ण आहे. होमआयसोलेशनमध्ये २३ रुग्ण आहेत तर एक रुग्ण रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. काल १९ डिसेंबर रोजी राज्यात नव्या ११ कोरोना रुग्णांची नोंद झाली यामध्ये मुंबईत सर्वाधिक ८ रुग्ण आढळून आले आहेत. गोव्यात १९ रुग्ण आढळून आले आहेत. (Marathi Tajya Batmya)

Eknath Shinde
New Laws : फौजदारी कायद्यात बदल; मॉब लिचिंग केल्यास होणार फाशीची शिक्षा; शहांची लोकसभेत माहिती

जेएन१ सब व्हेरियंट आला आढळून

भारतात कोरोनाचा नवा सब व्हेरियंट जेएन १ आढळून आला आहे. याचा पहिला रुग्ण आठ डिसेंबर रोजी केरळमध्ये आढळला होता. यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर असून केंद्राने सोमवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना देशात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होत असताना आणि JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळल्याने काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.