Nagpur JN1 Variant: गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू असलेल्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचा प्रसार गतीने होत आहे. यामुळे या रुग्णांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देत आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. रुग्णांच्या चाचण्यांची संख्या वाढली. चाचण्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत आहेत.
उपराजधानीत सध्या या व्हेरियंटचा एकही रुग्ण नाही. तर चाळीसवर नमुन्यांचा जिनोम सिक्वेसिंगचा अहवाल प्रलंबित आहे. दोन अडीच वर्षे कारोनाच्या महासाथीवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांशी संवाद साधल्यानंतर या व्हेरियंटच्या प्रसाराचा वेग वाढला, तरी संसर्ग घातक नाही. घाबरण्याचे कारण नाही, मात्र काळजी घ्यायला हवी? असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
आरोग्य यंत्रणेने ‘जेएन-१’ या व्हेरियंटच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘कोरोना टास्क फोर्स’ स्थापन केला आहे. तज्ज्ञांच्या मते जेएन-१ हा व्हेरियंट डेल्टा, ओमायक्रॉननंतरपेक्षा सौम्य आहे. सध्याचे थंड वातावरण संसर्ग आणि रुग्णवाढीला पोषक आहे. त्यात नववर्षाचा आनंद लुटण्याचे दिवस असल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्या माध्यमातूनही संसर्ग होऊ शकतो. सहआजार, श्वसनाचे विकार असलेल्यांकडून संसर्ग वाढू शकतो. सर्दी, नाक चोंदणे या लक्षणांसह ताप असेल त्यांना त्रास होऊ शकतो. तीन दिवस ताप लांबला, तर चाचणी करून घ्यावी. केवळ ‘व्हायरल ताप’ म्हणत या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे डॉ. निवृत्ती राठोड म्हणाले.
जेएन - १ विषयी
जेएन - १ हा कोरोनाच्या बीए.२.८६ या उपप्रकाराचा भाग असून तो नवा नाही. सप्टेंबरमध्येच या उपप्रकाराचा संसर्ग झाला होता. हा उपपक्रार आधीच्या बीए-२.८६ या ओमिक्रॉन या प्रकारापासून तयार झाला. देशात बीए.२.८६ चा प्रवेश डिसेंबर २०२१ मध्ये झाला होता. बऱ्याच दिवसांनी सामान्यांमध्ये सौम्य आजाराची लक्षणे दिसून आली. या विषाणूंच्या जनुकीय रचनेत सतत बदल होतो. देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे लसीकरण मोठ्या संख्येने झाले आहे. या लसीकरणामुळे सहआजार असलेल्या अनेक रुग्णांमध्ये या आजाराची तीव्रता वाढली नाही. जेएन.१ प्रकारच्या कोरोनाचा संसर्ग तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. इतर देशाच्या तुलनेत तसेच देशातील लोकसंख्येच्या तुलनेत संसर्गाचे प्रमाण अल्प आहे. यामुळे धास्तावून जाण्याची गरज नाही.(Latest Marathi News)
संसर्ग वाढीस कारण की...
थंड वातावरण
सहआजार
श्वसनविकार
ही आहेत जेएन.१ ची लक्षणे
सर्दी
ताप
जुलाब
अंगदुखी
डोकेदुखी
खोकला
या उपाययोजना करा
सार्वजनिक वावर टाळावा
विलगिकरणात राहावे.
स्वॅब चाचणी करावी
प्रादुर्भावाची शक्यता असल्याने मास्क वापरावा
लसीकरण करावे
पोषक आहार घ्यावा
लिंबूवर्गीय फळे घ्यावीत
पुरेसे पाणी प्यावे
पुरेशी झोप घेत तणावमुक्त राहावे
संसर्ग झाल्यास आरोग्य यंत्रणेला माहिती द्यावी
हात धुवावेत
सॅनिटायझर वापरावे
आरोग्य यंत्रणेने ‘गरज असेल तिथे तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा,’ असे म्हटले आहे. मात्र संसर्गाची शक्यता, कामाचे स्वरूप, गर्दी आणि सहआजार या सर्वांचा विचार करून मास्क वापरावाच. रोगप्रतिकाशक्ती कमी असलेल्या व्यक्ती, गर्भवती माता, सहआजार असलेल्या व्यक्तींनी मास्कचा वापर अवश्य करावा. (Latest Marathi News)
जागतिक आरोग्य संघटनेनुसार हा प्रकार भयावह नाही. ऋतुमानानुसार व्हायरल आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे आता दिसणारी जेएन -१ ची वाढणारी साथ लवकरच ती कमी होईल- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.