मोवाड (जि. नागपूर) : कोरोना (Corona) महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाउन (lockdown) लावण्यात आले. त्यामुळे मोठी शहरे वगळता ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, व्यापारी, शालेय विद्यार्थ्यांचे भवितव्य तसेच बेरोजगार युवकांवर मोठे संकट कोसळले आहे. लॉकडाउनमुळे एकीकडे कहर कोरोनाचा तर दुसरीकडे प्रश्न भाकरीचा अशा दुहेरी संकटात आज शेतकरी, मजूर, युवक अडकला आहे. (Corona on the one hand the question of food on the other Nagpur rural news)
बँड व्यावसायिकांना पोटापाण्याचा प्रश्न येऊन पडला आहे. अनेक पानविक्रेत्यांचे दुकान बंद झाले. त्यामुळे त्यांना आपल्या परिवाराचे उदरभरण करणे खूप कठीण झाले आहे. मागील वर्षापासून आम्ही पूर्णतः बेरोजगार झालो आहोत. त्यामुळे माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे आता कठीण झाल्याची कैफियत मयूर इंगोले या युवा बँड व्यावसायिकाने व्यक्त केली.
आता ग्राहक दाढी-कटिंग करायला येत नाही. लॉकडाउनमुळे मोठे नुकसान झाले आहे. माझ्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याचे शल्य पुरूषोत्तम राऊत या सलून व्यावसायिकाने व्यक्त केले. नगरपरिषदेच्या गाळ्याचे भाडे व माझे कुटुंब चालवणे खूप कठीण झाले आहे. काय करावे कळत नाही, असा प्रश्न जितेंद्र वैद्य या हार्डवेअर व्यावसायिकाने व्यक्त केला.
कपड्याच्या दुकानातील ग्राहकी पूर्णतः बंद झाली. त्यामुळे आज न.प.ला रुमभाडे व माझ्याकडे असलेल्या माणसांची मजुरी देणे सुध्दा होत नाही, असे कापड व्यावसायिक प्रशांत घावडे म्हणाला. लग्नाचे कार्यक्रम बंद असल्यामुळे ग्राहकांनी भांड्याच्या दुकानाकडे पाठ फिरवली. त्यामुळे मला माझ्या कुटुंबाचे संगोपन करणे खूप कठीण झाले असल्याचे नीलेश हटेकर हा स्टीलभांडे व्यावसायिक म्हणाला.
शेतीच्या मशागतीसाठी लागणारी वस्तू मिळत नाही. हार्डवेअरची दुकाने बंद असल्यामुळे शेतीची कामे थंडबस्त्यात असल्याची स्थिती मनोज नेरकर या युवा शेतकऱ्याने सांगितली. भीतीमुळे शेतीचे कामे बंद असल्यामुळे मोलमजुरी करणे कठीण झाल्याचे दुःख योगेश देवते या शेतमजुराने व्यक्त केले.
(Corona on the one hand the question of food on the other Nagpur rural news)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.