कोरोनाबाधितांसाठी अमरावतीचे सुपर सज्ज, मात्र रुग्णांना हवे नागपूरच; मेडिकल, मेयोसह एम्सलाच पसंती 

corona patients are not ready to shift at Amravati super hospital from Nagpur
corona patients are not ready to shift at Amravati super hospital from Nagpur
Updated on

नागपूर : गेल्या दोन दिवसांत नागपुरात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. एकाच दिवशी साडेसहा हजार कोरोनाबाधित आढळल्यामुळे प्रशासन हादरले. नागपुरातील खाटांची संख्या तोकडी पडणार असल्याचे लक्षात येताच जिल्हा प्रशासनाने नागपूरच्या रुग्णांसाठी अमरावती येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ५ खाटा राखीव ठेवल्या आहेत. मात्र, नागपुरातून आतापर्यंत २५ कोरोनाबाधितांना अमरावतीला दाखल केले असल्याची माहिती मिळाली. 

अमरावती येथे अनेक रुग्ण जाण्यास इच्छुक नसून मेडिकल, मेयोसह एम्समध्येच खाटा उपलब्ध करून द्यावे, अशी विनवणी मेडिकलमधील डॉक्टरांना करण्यात येत आहे. 

ग्रामीण भागातील रुग्णांनी कोणताही वेळ न दवडता ताप, अंगदुखी, सर्दी-पडसा, वास जाणे ही लक्षणे जाणवल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करावी, असे आग्रही आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले. गेल्या दोन तीन दिवसांत रुग्णसंख्या सातत्याने पाच हजारांच्या वर आहे. अशा परिस्थितीत प्रशासन युद्धस्तरावर नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत आहे. याच हेतूने अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सध्या ५० खाटा राखीव असल्याचे सांगण्यात आले. 

दरम्यान, ग्रामीण भागातील नागरिकांनी परिस्थितीत मेयो, मेडिकल, शालिनीताई मेघे, हॉस्पिटल लता मंगेशकर हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल या ठिकाणची बेडची उपलब्धता व अन्य माहितीसाठी कॉल सेंटरचा वापर करावा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. जिल्हा नियंत्रण कक्षातील 0७१२-२५६२६६८ व १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

संपादन - अथर्व महांकाळ 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()