किती निष्काळजीपणा? पाच दिवसांपूर्वी आमदार कोरोना पॉझिटिव्ह; आज आंदोलनात

Corona Positive MLA Present in BJP Agitation
Corona Positive MLA Present in BJP Agitatione sakal
Updated on

नागपूर : नागपुरात कोरोनाची संख्या (Nagpur Corona Cases) दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज दोन हजारांच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. पण, आमदारांनाच कोरोनाचा विसर पडल्याचे दिसतेय. पाच दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेले भाजप आमदार कृष्णा खोपडे (BJP MLA Krishna Khopade) आज आंदोलनात दिसले. आमदार कोरोनाचे सुपरस्प्रेडर तर ठरत नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Corona Positive MLA Present in BJP Agitation
नागपूर तीन झोन डेंजर; शुक्रवारी आढळले ६९८ कोरोना रुग्ण

भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी पाच दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करून दिली होती. त्यानंतर आज ते अचानक भाजपच्या आंदोलनात दिसून आले. या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांची देखील तुफान गर्दी होती. इतकंच नाहीतर कोरोना पॉझिटिव्ह आमदारांचा मास्क देखील हनुवटीच्या खाली दिसतोय. पॉझिटिव्ह आमदारांपासून इतराना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. कोरोनाचे नियम फक्त जनतेसाठीच का? लोकप्रतिनिधींचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असताना आंदोलनात कसे काय उपस्थित होते? असा सवाल विचारला असता, आरोग्य अधिकाऱ्यांसोबत बोलल्यानंतर मी घराच्या बाहेर पडल्याचं उत्तर त्यांनी दिलं. पण, पॉझिटिव्ह आमदार आता कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरणार का? अशी भीती निर्माण झाली आहे.

आंदोलन नेमकं कशासाठी? -

''मी मोदीला मारू शकतो आणि त्यांना शिव्याही घालू शकतो'' असं वक्तव्य नाना पटोलेंनी केलं होतं. त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पटोलेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच आज भाजप नेते चंद्रशेखर बावनुकळेंच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. यावेळी कोरोना पॉझिटिव्ह असलेले आमदार आंदोलनात उपस्थित होते.

नागपुरात कोरोनाची रुग्णसंख्या किती? -

कोरोनाचा जिल्ह्यात हाहाकार सुरू झाल्याचे संकेत मिळाले असून मृत्यूसत्र आता सुरू झाले आहे. सोमवारी एकाच दिवशी ४ जण दगावले. यामुळे आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे. वाढती कोरोनाबाधितांची संख्या धोक्याची ठरणार आहे. अवघ्या पाच दिवसांचा विचार केल्यास जिल्ह्यात १२ जणांचे कोरोनाने मृत्यू झाले. ८ महिन्यातील उच्चांकी २ हजार ४५१ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर मागील १७ दिवसात १७ हजार ४७४ बाधित आढळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.