नागपूर : कोव्हॅक्सिन पुरवठ्याअभावी लसीकरण झाले ठप्प

कोव्हॅक्सिनचा साठा मोजका असल्याने महापालिकेचे अनेक केंद्र पडण्याच्या मार्गावर
Covaxin
Covaxin Sakal
Updated on

नागपूर : शहरात कोव्हॅक्सिनचा पुरवठा ठप्प असल्यामुळे लसीकरण आता संथगतीने सुरू आहे. कोव्हॅक्सिनचा साठा मोजका असल्याने महापालिकेचे अनेक केंद्र पडण्याच्या मार्गावर आहेत. यातच १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणावरही परिणाम झाला आहे. १२ वर्षे वयोगटातील लसीकरणही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे.

महापालिकेच्या केंद्रावर लसीकरणासाठी दैनंदिनसहा हजार डोसची गरज असते. मात्र सोमवारी केवळ २ हजार लसींचा पुरवठा झाला. आज (मंगळवारी) देखील हीच स्थिती होती. कोव्हॅक्सिनच्या पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये महिनाभराचेच अंतर असल्याने सध्या दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र तुलनेत लसीचा साठाच संपल्याने दुसऱ्या डोससाठी या वयोगटातील व्यक्तींना परत जावे लागत आहे. राज्य सरकारकडून कोव्हॅक्सिनचा साठा मिळत नसल्याने केवळ चार ते पाच केंद्रावरच कोव्हॅक्सिनची लस उपलब्ध असते.

सहा महिन्यांनंतर प्रथमच लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. यापूर्वी जून व जुलै महिन्यात तुटवडा निर्माण झाला होता. १५ ते १७ वयोगटातील पात्र लाभार्थ्यांच्या लसीकरणाला सुरवात झाल्यानंतर शहराला दररोज दहा हजार कोव्हॅक्सिन डोसची आवश्यकता आहे. शाळांमध्येही या वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू झाले. मात्र लस साठ्याचा तुटवडा निर्माण झाल्याने त्यावर परिणाम झाला आहे.

१६ केंद्रावर लसीकरण

१५ ते १८ वयोगटातील अडीच लाख मुले आहेत. या वयोगटातील मुलांचे २ फेब्रुवारीपर्यंत ७३ हजार ६७२ मुलांना पहिला डोस तर ४०३१ मुलांना दुसरा डोस देण्यात आला. फेब्रुवारीत कोव्हॅक्सिनचा साठा नियमित पुरविण्यात न आल्याने १५ ते १८ वयोगटासाठीचे लसीकरण प्रभावित झाले आहे. सध्या १६ केंद्रावर लसीकरण सुरू आहे, मात्र महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी कोव्हॅक्सिन तुटवडा असला तरी लसीकरण सुरू असल्याचे सांगितले.

  • १६ जानेवारी २०२१ पासून फ्रन्टलाईन वर्करसाठी लसीकरण अभियान सुरू

  • १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले.

  • ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.