नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रोज निघणारे आणि बदलणारे आदेश आता मनोरंजनाचा विषय झाला आहे. याचा व्यवसायाला फटका बसत असल्याने व्यावसायिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे ग्राहकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एकदाचे काय ते ठरवावे आणि दुकाने सुरू ठेवण्याची आणि बंद करण्याची निश्चित वेळ (shop timing) जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे.
कोविड (coronavirus) आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांची (omicron variant) संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यातून काही प्रतिष्ठांनाना वगळले आहे. यात हॉटेल्स, बार, मद्य विक्रीची दुकाने आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांचा समावेश आहे. राज्य सरकारचे आदेश महाराष्ट्राला लागू होतात. मात्र, राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती व रुग्णसंख्या बघून त्यात बदल करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना दिले आहे. तेव्हापासून चांगलाच घोळ सुरू आहे. रोजच आदेश बदलवल्या जात आहेत.
नागपूर जिल्ह्यात पाच दिवसांत तीन वेळ आदेश बदलण्यात आले आहेत. त्यामुळे दुकाने केव्हा बंद होतील याचा काही नेम राहिलेला (shop timing) नाही. सर्वप्रथम २४ डिसेंबरला कोविड आणि ओमिक्रॉनचे (omicron variant) रुग्ण वाढत असल्याचे सांगून रात्री नऊनंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानुसार सर्व दुकाने रात्री नऊ वाजता बंद करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी हॉटेल, भोजनालये, बार रात्री बारा वाजेपर्यंत तर मद्य विक्रीच्या दुकानांना रात्री साडेदहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.
राज्य सरकारच्या आदेशात या प्रतिष्ठांनाना वगळण्यात आल्याचे दुसऱ्या दिवशी सांगण्यात आले. मात्र, सरकाराचा आदेश समजायला एक दिवस उशीर झाल्याने व्यावसायिकांना चांगलाच फटका बसला. मंगळवारी (ता. २८) जिल्हाधिकारी विमला आर यांच्या आदेशाचा हवाला देऊन शहरातील सर्व रेस्टॉरेंट, बार, दुकाने रात्री नऊ वाजता बंद करण्यात आलीत. त्यामुळे पुन्हा संभ्रम निर्माण झाला.
लगेच बुधवारी पुन्हा आदेशात सुधारणा करण्यात आली. त्यानुसार बार, हॉटेल आणि भोजनालयांना बारा वाजेपर्यंत तर दुकानांना साडेदहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली (shop timing) आहे. राज्य सरकार, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका आयुक्तांमार्फत वेगवेगळे आदेश निघत असल्याने व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात पोलिस आयुक्त हेसुद्धा आपल्यास्तरावर वेगळे आदेश काढतात. त्याची पोलिसांमार्फत सक्तीने अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांच्याच काहीच ताळमेळ नसल्याचे दिसून येते.
३१ डिसेंबरच्या पार्ट्यांवर बंदी
जिल्हाधिकारी विमला आर यांनी ३१ डिसेंबरला नवीन वर्षांच्या स्वागतासाठी होणाऱ्या मद्यपार्टी, डीजे, डान्स आदी सर्व पार्ट्यांवर बंदी घातली आहे. तसे बुधवारी काढलेल्या आदेशात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे. मात्र, या दिवशी बार, हॉटेल्स आणि मद्य विक्रीची दुकाने किती वाजेपर्यंत सुरू राहतील याचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे पुन्हा आदेश बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.