नागपूर : कोरोनाचा नविन व्हेरियंट असलेल्या ‘एक्सबीबी.१.१६’ची संख्या वाढत असतानाच कोरोनाची बाधा झालेले १५७ बाधित मंगळवारी एकाच दिवशी आढळल्याने प्रशासन हादरले आहे. वाढत्या बाधितांच्या संख्येने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली असतानाच सर्वसामान्यांमध्येही भयाचे वातावरण दिसत आहे.
नव्या १५७ बाधितांमध्ये शहरातील १०१ तर ग्रामीण भागातील ५४ बाधित आहेत. विशेष असे की, २४ तासांपूर्वी ४८८ चाचण्यांमध्ये केवळ १२ बाधित आढळले. तर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी ९३७ चाचण्यांमध्ये १५७ बाधित आढळले ही धोक्याची घंटा आहे. वाढत्या कोरानाची दखल घेत एकाच दिवशी १५७ बाधित जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे.
नियमांचे करा पालन
नागपुरात सर्दी, खोकला, ताप आदी लक्षण असलेले रुग्ण घरोघरी आहेत. यामुळेच तपासणीतून बाधित आढळत असून बाधितांची संख्या वाढत आहे, असे तज्ज्ञ सांगत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्यानंतर रुग्ण बरे होत आहेत. यामुळे कोरोनाचा संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
१३ महिन्यांपूर्वी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी १७५ तर १८ फेब्रुवारी २०२२ रोजी १४७ बाधित आढळले होते. यानंतर रुग्णसंख्या ओसरली होती. जुलै २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान, रुग्णांची संख्या शून्य तसेच अल्प होती. यामुळे कोरोनाला घाबरू नका मात्र दक्षता बाळगा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नवीन व्हेरियंटचे ७० रुग्ण
जिल्ह्यात कोरोनाचा ‘एक्सबीबी.१.१६’ हा नवीन रूपातील विषाणू आढळून आला आहे. या नवीन व्हेंरियंटचे आतापर्यंत ७० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ९९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे या नवीन व्हेरियंची लागण झाली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरण्यात यावा.
जिल्ह्यात एकूण सक्रिय बाधित -४४७
शहरातील एकूण बाधित -३०८
ग्रामीण भागातील बाधित -१३२
जिल्ह्याबाहेरील बाधित -७
सक्रिय रुग्णांपैकी गृहविलगीकरणातील बाधित -४१५
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित - ३२
मास्कच्या वापरासह कोविडबाबत दक्षता बाळगावी. गर्दीच्या आणि बंदिस्त ठिकाणी सहव्याधी असणाऱ्या व्यक्तीनी तसेच वृद्धांनी जाणे टाळावे. शिंकताना, खोकलतांना नाक रुमाल वापरावा. हाताची स्वच्छता राखणे, वारंवार हात धुणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळणे तसेच कोविड लक्षणे आढळल्यास तत्काळ कोविड चाचणी करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूंचा प्रसार व प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करावा.
-डॉ. विपिन इटनकर, जिल्हाधिकारी, नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.