नागपूर : ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी शासनाकडून विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या. त्या योजनांनाच सुरुंग लावण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि अधिकारी करीत असल्याचे समोर आले आहे. गेल्या दहा वर्षांत ४४ योजनांमध्ये ५५० लाचखोर अधिकारी आणि लोकप्रतिनिधी सापळ्यात अडकले आहे. त्यांच्याकडून विकासाची कोणती अपेक्षा करावी, असा संतप्त सवाल जनमानसातपण उमटत आहे.