नागपूर : सोशल मीडिया साईट्सवर ओळख करीत सात जणांशी लग्न करून त्यांना लाखो रुपयांनी फसविणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन’ला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. तिने अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळत इतर तिघांचा अर्ज मात्र मंजूर केला.
समीरा फातिमा वल्द मुक्तार अहमदसह आई रेहाना जमाल, काका मौसिन अन्सारी, त्यांची पत्नी निखत फरझाना, हरीश, वसीम, वसीम शेख अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी फलके यांच्या समक्ष सुनावणी झाली.
गिट्टीखदान परिसरातातील प्रॉपर्टीचा व्यवसाय करणाऱ्या तक्रारदारास फेसबुकद्वारे रिक्वेस्ट पाठवत तिने आपल्या जाळ्यात ओढले. एका हॉटेलमध्ये बोलावत त्याच्यासोबत अश्लील फोटो काढले. त्यानंतर, समीरा फातिमाने व्हिडिओ आणि फोटोद्वारे ब्लॅकमेलिंग करीत त्यांना लग्नासाठी गळ घातली.
नकार दिल्यावर थेट नातेवाइकांसोबत घरी येऊन तमाशा केला व जबरदस्तीने लग्न करण्यासही भाग पाडले. काहीच दिवसात तिच्यासह नातेवाईक प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू लागले. शिवाय सातत्याने फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, दहा लाखांनी लुबाडले.
मात्र, एक दिवस बिंग फुटल्याने समीरा अशाच प्रकारे पुरुषांची फसवणूक करीत असल्याचे लक्षात येताच, त्यांनी गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याशिवाय इतर पोलिस ठाण्यातही तिच्या विरोधात तक्रार होती. न्यायालयाने केवळ आई रेहाना, काका मौसिन व काकू निखत फरझाना यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.
उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान पोलिसांनी चौकशीतून मिळविलेले दस्तऐवज सादर केले. यामध्ये, आरोपीला तडजोडीपोटी दिलेल्या दहा लाख रुपयांचा देखील खुलासा झाला. तसेच, तीने सोशल मीडियाद्वारे ओळख करीत इतरांची देखील फसवणूक केल्याचे समोर आले. तपासामधील याच बाजू ग्राह्य धरीत उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.