नागपूर : चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत सहा जणांवर गुन्हे

लहान मुलांशी संबंधित अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करणे हा गुन्हा आहे.
Child pornography
Child pornographySakal
Updated on

नागपूर : चाइल्ड पॉर्न व्हिडिओ (Child Porn Video) बाळगल्याबद्दल आणि सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Video viral on social media)केल्याप्रकरणी सायबर पोलिस (Cyber Police) स्टेशनने ६ जणांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. सोशल मीडियावर (social media)लोक लहान मुलांशी संबंधित अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करत होते.

Child pornography
नागपूर : उॅंट मर गए तो मेनका गांधी मुआबजा देंगी क्या?

चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत (Child pornography)राज्य पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर महाराष्ट्र सायबर सेलकडून नजर ठेवण्यात येत आहे. यासोबतच शहर व ग्रामीण पोलिसांशीही माहिती दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सायबर सेलकडून नागपूर पोलिसांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. त्याआधारे सायबर पोलिस स्टेशनने एफआयआर नोंदवून तपास सुरू केला. सदर पोलीस ठाण्यात दोन, वाडी, मानकापूर, यशोधरानगर आणि अजनी पोलीस ठाण्यात प्रत्येकी १ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी मुलांचे अश्‍लील व्हिडिओ केवळ त्यांच्या उपकरणांमध्ये सेव्ह केले नाहीत तर ते सोशल मीडियावर इतर लोकांनाही पाठवले. डीसीपी ईओडब्ल्यू चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने ही कारवाई केली.

Child pornography
वर्धा : अवैध गर्भपात 'अभ्यास' गटाच्या हाती जुनीच माहिती

लहान मुलांशी संबंधित अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करणे हा गुन्हा असल्याचे तिडके यांनी सांगितले. मोबाईलमध्ये सेव्ह करणेही गुन्हा आहे. असे व्हिडिओ फॉरवर्ड करू नका किंवा तुमच्या गॅझेटमध्ये सेव्ह करू नका. असे कोणी करत असेल तर सायबर पोलिस स्टेशनला कळवा. अशा व्हिडिओंवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. पुढील कारवाई सुरूच राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.