खापरखेडा (जि. नागपूर) : पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही गावे अत संवेदनशील क्षेत्रात गणली जातात. परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढीस लागला आहे. दिवसेंदिवस परिसरात देशीकट्टे, धारदार शस्त्रे बाळगून खुनाच्या घटना घडत असतात. अशा घटनांवर अंकुश लावण्यात पोलिसांना अपयश आल्याने परिसर जणू काही युपी-बिहारसारखा तर नाही होणार ना, असा सवाल नागरिक करीत आहेत. वलनी, सिल्लेवाडा, चणकापूर, खापरखेडा, दहेगाव क्षेत्रात अनेकदा प्राणघातक हल्ल्यात आणि गोळीबार हत्याकांडात देशी कट्टे माऊजरचा व धारदार शस्त्राचा वापर पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे.
सराईत गुन्हेगारांनी अवैधरित्या असे अग्नीशस्त्र कुणाजवळून विकत घेतले, कुठून आलेत आणि त्याचा उद्देश काय, याचा तपासही करणे पोलिसांना आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे. नुकताच खापरखेडा परिसरात धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या झाल्याच्या घटनेने गजाआड केलेल्या आरोपींचा पीसीआरदरम्यान आरोपीच्या घरून देशी कट्टा व दोन जिवंत काडतूस आढळून आले. यावरून लक्षात येते की परिसरातील अनेक गुन्हेगाराजवळ अग्नीशस्त्रे आहेत आणि अशी अग्नीशस्त्रे खरेदी-विक्रीसुद्धा होत असल्याची चर्चा सर्वसामान्य नागरिक दबक्या आवाजात करीत असतात.
खून, दरोडा, लूटमार प्राणघातक हल्ला यासारख्या गुन्ह्यांमध्ये अनेकदा सराईत गुन्हेगार अग्निशस्त्राचा व धारदार शस्त्राचा वापर करीत असल्याने आता सर्वसामान्य नागरिक सुरक्षित राहिला नाही. अशा वारंवार होणाऱ्या घटनामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही गावे अतिसंवेदनशील क्षेत्र नावाने ओळखल्या जातात. परिसरात कोळसा खाणी, वीज निर्मिती केंद्र, बाजारपेठ असल्याने नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सन१९८४ नंतर वलनी, चनकापूर, सिल्लेवाडा परिसर हा २६ जुलै२०१० च्या वलनी येथील अन्वर हत्याकांडानंतर प्रकाशझोतात आले. यानंतरही या भागात गुन्हेगारीच्या घटना घडणे काही नवीन राहिले नाही.
देशीकट्टा, माऊजर, काढतूससारखे अग्निशस्त्र वापरणाऱ्या अनेक गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केल्याच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत. या भागात अवैध धंदेही मोठ्या प्रमाणात चालत असतात. अवैध धंद्यामध्ये गुन्हेगारांची टोळी बनत असते. अशावेळी या गुन्हेगारावर वेळीच लगाम बसत नसल्याने त्यांची हिंमत अधिक वाढत असून मनोबल उंचावले. शिवाय एवढेच नव्हे तर संबंधित पोलिस अधिकारी आर्थिक लाभापोटी अवैध धंदेवाल्यांवर आशीर्वाद देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत असते.
स्थानिक पोलिस व गुन्हे शाखा पोलिस अवैध धंदेवाल्यावर कारवाई करणार असल्याची माहिती आधीच त्यांना माहिती होते. मग ही माहिती त्यांना पुरवितो कोण, असा प्रश्न निर्माण होऊन पोलिसांचे गुन्हेगाराशी जवळीक संबंध असल्याने माहिती उघड होत असल्याचे ग्रामस्थ बोलू लागले. परिसरात शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी सर्च ऑपरेशन करणे गरजेचे आहे. जर सर्च ऑपरेशन केले तर अनेक गुन्हेगाराजवळ देशीकट्टा, माऊजर जप्त होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.