‘सलुन, स्पा’च्या नावावर देहव्यापार; एकीची सुटका

देहव्यापार करणाऱ्या एकास सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने अटक केली
crime news Prostitution in salon spa one girl release safely from that nagpur
crime news Prostitution in salon spa one girl release safely from that nagpur देहव्यापार
Updated on

नागपूर : प्रतापनगरातील जयताळा मंगलमूर्ती चौक येथे सलुन आणि स्पॉ च्या नावावर देहव्यापार करणाऱ्या एकास सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने अटक केली. यावेळी पथकाने एका पिडितेची सुटका केली. अरविंद मोहनलाल भारती उर्फ मनिष पांडे ( वय ३४, रा. वैभव नगर, वाडी) असे अटक करण्यात आलेल्या मालकाचे नाव आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून प्रतापनगर येथील जयताळा परिसरातील मंगलमूर्ती चौकात असलेल्या हेअर मॅजीक युनीसॅक्स सलुन अॅण्ड ब्युटी स्पॉ यामध्ये देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे चौकशी करीत, पथकाने सापळा रचला.

ठरल्याप्रमाणे एका ग्राहकाला पाठवून त्याने इशारा करताच पथकाने छापा टाकला. यावेळी पथकाने अरविंद भारती यास अटक केली. यावेळी तो स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता पिडीत महिलेला पैशाचे आमिष दाखवित तिच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यासाठी तो सलुन उपलब्ध करुन देत असल्याचेही निदर्शनास आले. पथकाने त्याच्या विरोधात प्रतापनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत, अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.