वर्धा : मुल होत नसल्याने पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने अंगावर पेट्रोल टाकून घेत स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील हिंगणघाट येथील प्रज्ञा नगर येथे घडली. सचिन ज्ञानेश्वर भगत (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी पत्नी विरुद्ध हिंगणघाट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुल होत नसल्याने विवाहितेचा छळ, आत्महत्या अशा अनेक घटना वाचण्यात ऐकण्यात येतात. मात्र मुल होत नसल्याने पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या करण्याची घटना कदाचितच ऐकण्यात येते. हिंगणघाट येथील सचिन भगत याचे नुतन भगत (वय ३०) हिच्याशी काही वर्षाआधी लग्न झाले.
दरम्यान नुतन हिला मुल राहत नसल्याने सचिन याला दोषी ठरवत त्याचा छळ सुरू केला. पत्नीच्या त्रासाला कंटाळून सचिन याने शुक्रवारी (ता. १८) अंगावर पेट्रोल टाकून घेत स्वतःला जाळून घेतले. दरम्यान यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी हिंगणघाट पोलिसात पत्नी नुतन भगत हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बाबु सुखदेव मुंडे करीत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.