मेडिकलमधून गॅंगरेपचा कैदी फरार; नागपूर पोलिसांनी रात्रभरात लावला छडा

मेडिकलमधून गॅंगरेपचा कैदी फरार; नागपूर पोलिसांनी रात्रभरात लावला छडा
Updated on

नागपूर ः अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर १० जणांनी गॅंगरेप केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी (Criminal) गेल्या तीन वर्षांपासून मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) शिक्षा भोगत होता. आजारी असल्याने त्याच्यावर मेडिकलच्या टीबी वार्डात (Medical TB ward) उपचार सुरू होते. सोमवारी रात्री दहा वाजता पोलिसांच्या हातावर तुरी देऊन कैद्याने पलायन केले. पोलिस विभागात एकच खळबळ उडाली. संपूर्ण शहर पोलिस सतर्क झाले. शेवटी पहाटेच्या सुमारास फरार कैद्याला पारडी-भवानीनगर परिसरातून अटक करण्यात आली. कृष्णा हरिदास डोंगरे (वय २५, रा. प्रतापनगर) असे अटकेतील कैद्याचे नाव आहे. (criminal ran away from Medical Nagpur)

मेडिकलमधून गॅंगरेपचा कैदी फरार; नागपूर पोलिसांनी रात्रभरात लावला छडा
सावधान! नामांकित कंपन्यांचे अनोळखी कॉल्स उचलताना १० वेळा करा विचार; अन्यथा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये मुलींच्या शासकीय संरक्षणगृहातून १६ वर्षीय मुलीने रात्रीच्या सुमारात पळ काढला. ती मुलगी सीताबर्डीत पोहचली. तिच्यावर आटोचालक असलेले कृष्णा डोंगरे आणि जीतू मंगलानी या दोघांची नजर गेली. एकटी मुलगी बघून त्यांनी तिला हेरले. तिला आटोने जरीपटक्यात नेले. तेथे दोघांनी तिच्यावर गॅंगरेप केला. त्यानंतर मुलीला खामला परीसरात मित्राच्या घरी ठेवले. तेथे कृष्णा आणि जितूने आपले ८ मित्र बोलावले. त्यांनीही रात्रभर मुलीवर गॅंगरेप केला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी कृष्णासह १० आरोपींना अटक केली होती. मुख्य आरोपी म्हणून कृष्णा गेल्या तीन वर्षांपासून कारागृहात होता. त्याला काही दिवसांपूर्वी टीबी झाला होता. त्याला जेल प्रशासनाने १० मे रोजी मेडिकलच्या टीबी वार्डात दाखल केले होते.

असा काढला पळ

दोन दिवसांपासून टीबी वार्डात पोलिस कर्मचारी निळकंठ ईवनाते यांची ड्युटी होती. सोमवारी रात्री दहा वाजता डोंगरे हा लघुशंकेला जाण्याचा बहाणा करून बाथरूममध्ये गेला. तेथून त्याने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढला. इवनाते यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पळून गेला. इवनाते यांनी लगेच कंट्‍रोल रूमला कॉल दिला. संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. रात्री उशिरापर्यंत कैदी हात लागला नव्हता.

मेडिकलमधून गॅंगरेपचा कैदी फरार; नागपूर पोलिसांनी रात्रभरात लावला छडा
राज्याच्या सीमांवर पोलिसांची नाकाबंदी; अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच वाहनांवर निर्बंध

अशी केली अटक

गॅंगरेपचा कैदी पळून गेल्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. पोलिस रात्रभर फरार कैद्याचा शोध घेत होते. परंतु तो आढळून आला नाही. तो भवानीनगरातील एका नातेवाईकाच्या घरात लपून असल्याची माहिती पारडी पोलिसांना मिळाली. त्यांनी पहाटेच्या सुमारास सापळा रचून कैद्याला अटक केली. यापूर्वी १६ मे २०२० मध्ये शिजो चंदर नदार हा मोक्काचा आरोपी टीबी वार्डातून पळून गेला होता. त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली होती.

(criminal ran away from Medical Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.