नागपूर : पोलिसांनी दोन आरोपींना न्यायालयात पेशीसाठी आणले. कागदपत्राची पडताळणी करण्यात पोलिस व्यस्त होते. यादरम्यान दोन्ही आरोपी गायब झाले. पोलिसांच्या ही बाब लक्षात येतात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी लगेच शोधाशोध केली. मात्र, काही वेळान दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
प्राप्त माहितीनुसार, एका प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयात पेशी झाल्यानंतर हवालदाराने त्यांना बाहेर आणले. कार्यालयीन दस्तऐवज घेण्यासाठी हवालदार पुन्हा न्यायालयात गेला. याचदरम्यान न्यायालयापासून काही अंतरावर आरोपींचे नातेवाईक उभे होते.
आरोपी त्यांच्याशी बोलायला गेले. काही वेळाने हवालदार बाहेर आला. त्याला आरोपी दिसले नाही. त्याला घाम फुटला. त्याने अन्य एका पोलिसाला विचारणा केली. ‘येथे आरोपी उभे होते, ते आता दिसत नाहीत,’ असे हवालदार त्यांना म्हणाला. लगेच आरोपी पळाले, आरोपी पळाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे न्यायालयात पसरले.
पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. काही अंतरावरच ते आरोपी नातेवाइकासोबत बोलताना दिसले. त्यांना बघताच पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या घटनेमुळे पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. काही पोलिस आरोपींच्या शोधण्यासाठी धावपळ करीत होते.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.