उनकी क्रुरता से एक ऊँट मर गया; साजन रबारी

रबारी संतप्त, अनेक उंट आजारी, अर्धमेले अवस्थेत
camel
camelsakal
Updated on

नागपूर : ``सतरा सौ किलोमीटर ऊॅंट चलके महाराष्ट्र में आए. तलेगाव-दशासरसे एकही दिन में पच्चास किलोमीटर ऊॅंट चलाके लाए गए. तब ऊॅंटो को कुछ नही हुआ. लेकिन महिने भर में गोशालासे ऊॅंट निकालतेही एक ऊॅंट मर गया. वो भुखमरी से मरा साब. लाख रुपये का नुकसान हो गया. हमे बर्बाद कर दिया.`` उंटपालक साजन रबारी अत्यंत संतप्त होऊन बोलत होते.

कत्तलीच्या तक्रारीवरून ताब्यात घेतलेले ५८ उंट अमरावती येथील जिल्हा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शनिवारी मुक्त करण्यात आले. दस्तूरनगर येथील गोशाळेतून सर्व उंट बाहेर आले. त्यापैकी अचानक एक उंट कोसळला. त्याने मान टाकली. उंट मरणासन्न झाला. त्याच्यासोबत असलेले वेरशी राना रब्बारी, रबारी प्रभा राना, रबारी जगा हिरा यांनी उंटाला बेशुद्धावस्थेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तातडीने झाडाची फांदी तोडली. त्याच्यापुढे टाकली.

पाणीही पाजले. अॅड. मनोज कल्ला यांनी पशुवैद्यकांना बोलावले. सलाईन लावल्यावर उंट सावरला. मोठ्या प्रयत्नाने त्याला उभे केले. परंतु थोडे अंतर चालून जाते न जाते तोच उंट कोसळला. तो गतप्राण झाला. उंटासोबत असलेले ७२ वर्षांचे विसाभाई शकुभाई रब्बारी यांनी अक्षरशः टाहो फोडला. इतरांच्याही डोळ्यात आसवे दाटून आली.

ही घटना गुजरातमथील रबारी वस्त्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचली. न्यायालयातून उंट सोडण्याचा आदेश होईपर्यंत गुजरातहून रबारी मुखिया साजन रबारी अमरावतीत ठाण मांडूण बसले होते. `सकाळ` प्रतिनिधीशी गुजरातहून बोलताना ते अक्षरशः संतापले होते. ते म्हणाले, ``पशुक्रुरतेच्या नावाखाली आम्हाला पकडले गेले. परंतु खरी क्रुरता कुणी केली असेल तर ती तक्रार करणाऱ्या प्राणी मित्रांनीच. हजाराहून जास्त किलोमीटर चालून आल्यानंतरही आमचे उंट ताजेतवाणे होते. परंतु येथे महिनाभर ठेवल्यानंतर अर्धमेले झाले आहेत. आता गुजरातमध्ये आम्ही मुखियांची बैठक घेत आहोत. पुढे काय करायचे, याचा निर्णय लवकरच घेणार आहोत.``

आज एकच उंट मेला. परंतु अनेक उंट अशक्त झाले आहेत. त्यामुळे आणखी उंट मरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या क्रुरतेविरुद्ध उच्च न्यायालयातच दाद मागितली जावू शकते.

-अजिंक्य शहाणे,पशु अभ्यासक, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.