Crypto Fraud : क्रिप्टोचा खेळ विदेशात, रक्कम एजंटांच्या घशात; स्थानिक पोलिसांना मर्यादा, गुंतवणूकदारांच्या चकरा

Financial fraud : दिवसाला अर्धा ते एक टक्का व्याज देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले. नामांकित हॉटेल्समध्ये सेमिनार घेत याची खात्री पटवून देण्याचे प्रयत्न झाले.
Crypto Fraud
Crypto FraudeSakal
Updated on

- गौरव डोंगरे

शेअर मार्केटकडे वळलेल्यांचा टक्का मागील काही महिन्यांत अचानक वाढला. याचाच गैरफायदा घेत फॉरेक्स ट्रेडिंग, क्रिप्टो करन्सीतून फायद्याचा खेळ सुरू झाला. ऑनलाइन गेम खेळा, पैसे मिळवा, परदेशातील नामांकित कंपनीत गुंतवणुकीतून डॉलरमध्ये कमाई करा, अशा आमिषांना गुंतवणूकदारांना बळी पाडण्यात आले. गांधीनगरातील ३६ जणांना ७४ लाखांचा गंडा घालून अशीच डॉक्सी कंपनी गायब झाली. गुन्ह्यातील संशयित हरियाना, पश्‍चिम बंगाल, नवी दिल्ली, तर माहिती देणारा विदेशात असल्याचे समोर आले.

दिवसाला अर्धा ते एक टक्का व्याज देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले. नामांकित हॉटेल्समध्ये सेमिनार घेत याची खात्री पटवून देण्याचे प्रयत्न झाले. ऑनलाईन सेमिनारमध्ये योजनांची माहिती देणारा ‘अलेक्झांडर’ विदेशातून बोलायचा. जिल्ह्याच्या मुख्य बाजारपेठा असणाऱ्या गांधीनगर, इचलकरंजी येथील अनेकांना ओढण्यात या कंपनीला यश आले; मात्र काही दिवसांतच सेमिनार बंद झाले. मुख्य संशयित फोन घेईनासे झाले.

ऑक्टिवा कॉईनचाही प्रकार असाच कॉईनची किंमत एक लाखावर जाणार असल्याचे भासवून गुंतवणूकदारांना असाच गंडा घालण्यात आला. कंपनीने कॉईनची किंमत एक लाख झाल्याचे संबंधित गुंतवणूकदाराच्या मोबाईलमध्ये दाखवले. काही दिवस दर वाढत गेल्याचे सांगत डिजिटल वॉलेटमध्ये रक्कमही वाढवत नेली. शेअर बाजारात घसरण झाल्याचे सांगत कॉईनची किंमत दोनशे रुपयांवर आणली. खाते नूतनीकरण केल्यानंतर पैसे वाढतील असे सांगून आणखीनच खोलात ओढले.

Crypto Fraud
Crypto Firms: नऊ विदेशी क्रिप्टो कंपन्यांना सरकारने पाठवली नोटीस; काय आहे प्रकरण?

अचानक गाशा गुंडाळला

नूतनीकरणाच्या नावाखाली गुंतवणूकदारांची खाती काही दिवस बंद राहणार असल्याचे संचालकाने कळविले. अचानक एक दिवस खात्याचे लॉग इन बंद करण्यात आले. कंपनीचे सॉफ्टवेअर बंद झाले. कोणालाही त्यातून पैसे काढणे शक्य झाले नाही. हे गुंतवणूकदार सध्या पोलिस ठाण्याच्या चकरा मारत आहेत.

कंपनीची नोंदणी विदेशात...

डॉक्सी कंपनीची नोंदणी अमेरिका, नायजेरिया, युरोप येथील ठिकाणी झालेली दिसून आली. ऑनलाइन सेमिनारमध्ये योजनेची माहिती देणारा ‘अलेक्झांडर’ हा नेमका कुठून माहिती द्यायचा, हे गुंतवणूकदारांना समजले नाही. भारतातील संचालक पश्‍चिम बंगाल, हरियाना, नवी दिल्ली येथील असल्याचे पुढे आले. सुमारे ७० लाखांची फसवणूक या क्रिप्टोच्या आडून करण्यात आली.

Crypto Fraud
Akola Fraud News : क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक; सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.