विचार केलाय? सायबर गुन्हेगारांकडे मोबाईल नंबर येतो कुठून?

विचार केलाय? सायबर गुन्हेगारांकडे मोबाईल नंबर येतो कुठून?
Updated on

नागपूर : बॅंकेतून बोलत आहे, कार जिंकली आहे, शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करा, एटीएम ब्लॉक झाले, गिफ्ट लागलंय किंवा लॉटरी लागली आहे, असा कॉल तुम्हाला कधी न कधी आला असेलच. मग त्यांच्याकडे आपला मोबाईल नंबर कसा गेला?, त्याने मलाच नेमका कॉल कसा केला? याचा कधी विचार केला आहे का? नाही न... मग लक्षात ठेवा आपल्या स्वतःच्या चुकीमुळेच सायबर गुन्हेगारांना रान मोकळे करून देत आहोत. सायबर गुन्हेगारांना आपण स्वतःहून आपले मोबाईल नंबर पुरवीत आहोत.

सायबर गुन्हेगारांकडे मोबाईल क्रमांकांची मोठीच्या मोठी यादी चक्क आपल्या चुकीमुळे जाते. आपण अनेकदा मोठमोठ्या पॉश मॉलमध्ये खरेदीस जातो. छानपैकी खरेदी केल्यानंतर एक सुंदर युवती आपल्याकडे येते. ‘एक्सक्युज मी सर... मी तुमचे दोन मिनिटं घेऊ का?’ अशा मधूर भाषेत संवाद साधते. सहाजिकच तिच्या बोलण्यावर आपण भाळतो. ती आपल्यासमोर फॉर्म धरते आणि स्कीम सांगायला सुरवात करते.

विचार केलाय? सायबर गुन्हेगारांकडे मोबाईल नंबर येतो कुठून?
संभाजीराजे हे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? तातडीने अटक करा

मॉलच्यावतीने ग्राहकांसाठी ‘लकी ड्रॉ’ काढण्यात येणार आहे. त्यामध्ये पहिले बंपर गिफ्ट म्हणून एक शानदार महागडी कार आणि दुसरे बक्षीस महिलांसाठी १० तोळ्याचा सोन्याचा हार आणि तिसरे बक्षीस म्हणून १० दुचाकी आहेत. ही प्रलोभन ऐकून आपण लगेच तिला मोबाईल क्रमांक देतो. आपल्या स्वतःच्या चुकीमुळे तसेच गिफ्ट, लकी ड्रॉ आणि बक्षीस मिळण्याच्या आमिषाला बळी पडल्यामुळे आपला मोबाईल नंबर बॉक्समध्ये टाकतो किंवा मॉलमध्ये उपस्थित प्रतिनिधीला देत असतो. अशाप्रकारे आपण स्वतःच आपला मोबाईल नंबर कळत न कळत सायबर गुन्हेगारांना देत असतो.

बिल बनवताना कशाला हवा नंबर

शॉपिंग सेंटरमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी आपण खरेदी केली की, बिल बनवणारी युवती लगेच आपल्याला मोबाईल नंबर सांगा, असा प्रश्‍न करते. परंतु, बिल बनवताना माझा मोबाईल नंबर कशाला हवाय, हा प्रश्‍न कधीच आपण विचारत नाही. बिलाचा आणि माझ्या मोबाईल नंबरचा काय संबंध? असा कधी विचारही करीत नाही. थेट नंबर देतो आणि बिल घेऊन मोकळे होतो. मग आपल्या नंबरचे काय होते माहिती आहे का?

‘डाटा’ म्हणजेच नगदी पैसा

शॉपिंग मॉलमध्ये एका महिन्यात जवळपास एक लाख ग्राहक येतात. म्हणजे त्यांच्याकडे एक लाख जणांचा डाटा असतो. सायबर गुन्हेगार असा डाटा चक्क विकत घेतात. त्यानंतर सुरू होतो फसवणुकीचा खेळ. मॉलमध्ये खरेदी करायला आलेले जवळपास मिडल क्लास असतोच. त्यांना सायबर गुन्हेगार फोन करून हेरतात. त्यापैकी अनेक जण त्यांच्या जाळ्यात अडकतात.

विचार केलाय? सायबर गुन्हेगारांकडे मोबाईल नंबर येतो कुठून?
भाजप आमदाराच्या घोटाळ्यावर किरीट सोमय्या गप्प का?
आपला मोबाईल क्रमांक कुठेही पटकन देण्याची सवय टाळा. बंपर गिफ्ट, लॉटरी, लकी कस्टमर ड्रॉ आदी भानगडीत पडू नका. आपल्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर होण्याची शक्यता असते. सायबर गुन्हेगारांपर्यंत आपले मोबाईल नंबर जाऊ शकतात. त्यामुळे गरज नसताना मोबाईल नंबर आणि खासगी माहिती देण्याचे टाळा. ऑनलाइन फसवणूक झाल्यास नजीकच्या पोलिस स्टेशन अथवा सायबर सेलमध्ये तक्रार करा.
- केशव वाघ, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर क्राईम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.