खापरखेडा (जि. नागपूर) : अण्णा मोड चौकात रविवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास ट्रक व सायकलचा भीषण अपघात झाला. या अपघातात सायकल चालक जागीच ठार झाल तर सायकलचा चुराडा झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बिहारी थगई राजभर (६९, रा. मीलन चौक, चनकापूर) असे मृताचे तर सय्यद फकुरुद्दीन झादा (५९, रा. छिंदवाडा) असे ट्रक चालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, MH-34-AV-0974 क्रमांकाचा ट्रक हा कोळसा खदान इथून कोळसा भरून डिझेल भरण्यासाठी अण्णा मोड येथील जगदंबा पेट्रोल पंपावर जात होता. विरुद्ध दिशेने सायकलस्वार हा सिल्लेवाडा येथून मीलन चौक चनकापूर येथे घरी जात होते. अण्णामोड चौकांत दोघांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की मृताचा अक्षरशः: चुराडा झाला.
मृत यांची चप्पल सायकलच्या चाकात अडकल्याने संतुलन बिघडून ट्रकच्या चाकाच्या मधोमध पडून चेंदामेंदा झाला. अपघात बघितल्यानंतर अंगाचे शहारे उडत होते. घटनेची माहिती खापरखेडा पोलिसांना मिळताच वाहतूक पोलिस कैलास पवार, पोलिस नायक दीपक रेवतकर, महिला पोलिस ऊर्मीला शेंडे, पोलिस उपनिरीक्षक राजेश पिसे, उपनिरीक्षक निमगडे, बीट जमादार जाधव यांनी घटनास्थळ गाठून बघ्यांच्या गर्दीला पांगविले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या मेयो हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आले.
घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार होत होता. मात्र, पोलिसांच्या समयसूचकतेमुळे ट्रक चालकाला लगेच ताब्यात घेतले. मृताच्या मुलगा शंकर बिहारी राजभर (वय ३२, रा. वॉर्ड नं. ५, तट्टा लाइन पोटा, चनकापुर) यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. खापरखेडा पोलिस पुढील तपास करीत आहे.
मृत हे वेकोलितून सेवानिवृत्त
मृत हे सिल्लेवाडा वेकोलितून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी मीलन चौक, चनकापूर येथे नवे घर बांधले होते. पती-पत्नी सोबत राहायचे व दोन्ही मुले पोटा कट्टा लाइन चनकापूर येथे राहायचे. सेवानिवृत्तीनंतरही ते अधून मधून सिल्लेवाडा क्वार्रटवर राहायचे. घटनेच्या दिवशी सिल्लेवाडा क्वार्टरवरून कुदळ, चण्याने भरलेली पिशवी व अन्य साहित्य बोरीत भरून सायकलवर लटकवून घेऊन जात होते. जाता जाता रस्त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.