‘विवस्त्र डान्स’ प्रकरण : पोलिसांनी केली दहा जणांना अटक

लोकांची गर्दी जमवून गावात बेकायदेशीर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची चर्चा आहे
Dance season
Dance seasonDance season
Updated on

उमरेड (जि. नागपूर) : उमरेड आणि कुही तालुक्यातील काही गावांमध्ये ‘डान्स हंगामा’ (Dance season) नावाची जाहिरात करून बंद शामियानात ‘विवस्त्र डान्स’चा अश्लील प्रकार सुरू असल्याचा व्हिडिओ शनिवारी (ता. २२) सोशल मीडियावर व्हायरल (Video goes viral) झाला होता. यानंतर उमरेड पोलिसांनी तत्काळ बाह्मणी गावात जाऊन तीन जणांना ताब्यात घेतले होते. याप्रकरणी रविवारी (ता. २३) आणखी सात जणांना अटक करण्यात आली. आतापर्यंत एकूण दहा जणांना अटक (Police arrested ten people) करण्यात आली आहे.

बाह्मणी गावातील एका पटांगणावर भव्य शामियाना उभारून त्या ठिकाणी शंभर रुपयांमध्ये डान्स बघण्यासाठी तरुणांनी चांगलीच गर्दी केली होती. नागपूरच्या ॲलेक्स डान्स शोच्या कलाकारांना आमंत्रित करून उमरेड पोलिसांची तसेच बाह्मणी ग्रामपंचायतची परवानगी न घेता लोकांची गर्दी जमवून गावात बेकायदेशीर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याची चर्चा आहे.

Dance season
डान्सच्या नावावर तरुणींचा ‘विवस्त्र डान्स’; १०० रुपये तिकीट

त्यामुळे आयोजकांवर व डान्स ग्रुपवर गुन्हे दाखल करण्यात आले. घटनेचा तपास पोलिस अधीक्षक विजय मगर, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकनिकर, उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेळे, पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राजू डोरलीकर करीत आहेत. रविवारी सात जणांना अटक केल्याने एकूण आरोपींची संख्या दहा (Police arrested ten people) झाली आहे.

चंद्रशेखर ऊर्फ लाला प्रभुजी मांढरे (३५), शिवराज नीलकंठ नागपुरे (२८), अनिल शालिग्राम दमके (४८), श्रीकृष्ण रतीराम चाचरकर (३५), बाळू गंगाराम नागपूरे (४०), हेमंत शंकर नागपुरे (३१), अरुण शंकर नागपुरे (३७), नंदू रामदास मांढरे (२९) सर्व राहणार ब्राम्हणी, तालुका उमरेड, बेताब बाबा सरोज (२५, रा. गोपीगंज, जि. बनारस, हल्ली मुक्काम - जुनी वस्ती बुद्धीविहार जवळ दिघोरी, नागपूर) व अर्षद अफजल खान (२६, छोटा ताजबाग, रघुजीनगर, भोसले वाडा, नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

शंभर रुपयांचे तिकीट

कुही तालुक्यातील मुसळगाव, भुगाव आणि सिल्ली तर उमरेड तालुक्यातील बाह्मणी या गावांमध्ये असा ‘डान्स हंगामा’चे (Dance season) आयोजन करण्यात आले आहे. डान्स हंगामाच्या तरुण-तरुणी विवस्त्र नृत्याचे (Video goes viral) सादरीकरण करीत आहेत. नागरिकांचीही गर्दी होत आहे. यासाठी शंभर रुपये तिकीट आकारले जात होते.

Dance season
आईला एचआयव्ही असल्याचे सांगून दहा दिवसांच्या बाळाची विक्री
पोलिस विभागाला बेकायदेशीर कार्यक्रमाची पूर्वकल्पना असती तर निश्चितच अश्लील नृत्याचे कार्यक्रम होऊ दिले नसते. अश्लील नृत्य प्रकरणात आतापर्यंत एकूण १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय ॲलेक्स डान्स ग्रुपचा म्होरक्या व तीन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बेकायदेशीर कार्यक्रमाला उमरेड पोलिसांनी किंवा कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले असेल तर त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- पूजा गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.