नागपूर ः शहरातील नामांकित डान्स ॲकेडमीतील डान्स टिचरने आपल्या २२ वर्षीय विद्यार्थिनीला दारू पाजून बलात्कार केला. तिचे नग्न फोटो काढले. ही घटना अजनीत उघडकीस आली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून अजनी आरोपी डान्स टिचर रोमियो गजानन गोडबोले (२५) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित २२ वर्षीय युवती रिया (बदललेले नाव) ही मूळची वर्धा येथील असून तिने नागपुरातून इंजिनिअरींग केले आहे. सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असून अजनीतील एका फ्लॅटमध्ये एकटीच राहते. तिची इंस्टाग्रामवरून डान्सर रोमियो गोडबोलेशी ओळख झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले आणि दोघांची चॅटिंग सुरू झाली.
दोघांची चांगली मैत्री झाली. रियाचाही स्वभाव बेधडक असल्यामुळे रोमियोने तिचा गैरफायदा घेण्याचे ठरविले. त्याने गेल्या काही दिवसांपासून तिला अश्लील मॅसेज, फोटो पाठवणे सुरू केले. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करायला लागला. त्याने सोमवारी दुपारी रियाला फोन केला. घरी पार्टी करण्यासाठी येत असल्याचे सांगितले. मित्र असल्यामुळे तिनेही नकार दिला नाही.
दुपारी दोन वाजता रोमियो रियाच्या फ्लॅटमध्ये आला. त्याने सोबत दारूच्या बाटल्या आणल्या होत्या. त्याने रंग लावला आणि दारू पिण्यासाठी दबाव टाकला. तिने नकार देताच तिला मारहाण केली आणि बळजबरीने दारू पाजली. दारू पिल्यानंतर रिया बेशुद्ध पडली. दोन तासांनंतर ती शुद्धीवर आली असता ती बेडवर नग्नावस्थेत होती. तर रोमीयो तिच्या बेडवर झोपलेला होता. तिने आरडाओरड केली असता रोमीयोने तिचे तोंड दाबले. तिच्याबर बलात्कार केल्याचे सांगितले.
मोबाईलमध्ये फोटो काढले असून यानंतर मी आल्यानंतर मला शारीरिक संबंधासाठी नकार दिल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याची माहिती आहे. त्यानंतर तो घरातून निघून गेला. रियाने घडलेला प्रकार लगेच नागपुरातील नतेवाईकांना सांगितला. त्यांनी वारंवार बलात्कार सहन केल्यापेक्षा पोलिसात तक्रार करण्याचा सल्ला दिला. मोठी हिम्मत करून रिया अजनी पोलिस ठाण्यात पोहचली.
पीएसआयने टाकला दबाव ?
रिया नातेवाईकासह अजनी पोलिस ठाण्यात पोहचली. रोमियोला माहिती मिळताच त्याने हुडकेश्वर पोलिस ठाण्यात असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाला सोबत घेतले आणि अजनी पोलिस स्टेशन गाठले. रियावर त्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी सामाजिक कार्यकर्त्यांमुळे अजनी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला, अशी चर्चा आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.