- अखिलेश गणवीर
नागपूर - परगावी नोकरीवर असलेले दिवाळी, दसरा आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्याचा बेत आखतात. त्यासाठी ट्रेनने प्रवास करण्याचे नियोजन करतात. मात्र मार्गावरून जाणाऱ्या सर्व ट्रेन सणासुदीला फुल्ल असल्याचे दिसून येताच गावी जावे कसे? असा प्रश्न पडतो. दिवाळी, दसऱ्याच्या दीड ते दोन महिन्याआधीच पुणे, मुंबईला जाणाऱ्या रेल्वेचे तिकीट बुकींग फुल्ल होत असल्याचा प्रकार दरवर्षीचाच असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.