सिलिंडर स्फोटात आईसह चिमुकलीचा मृत्यू

आयता येथील घटना; महिला नऊ महिन्यांची गर्भवती
daughter and mother dies cylinder explosion yavatmal
daughter and mother dies cylinder explosion yavatmalsakal
Updated on

आर्णी (जि. यवतमाळ) : सिलिंडरचा स्फोट झाल्याने या अपघातात मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आर्णी तालुक्यातील आयता येथे बुधवारी (ता. नऊ) सकाळी साडेआठ वाजता घडली. आईला कवटाळून तिच्या कुशीतच चिमुकलीने अखेरचा श्‍वास घेतला. आग आटोक्यात आणल्यानंतर दोघींना घराबाहेर काढताना विदारक दृश्य बघून उपस्थितांना आपले अश्रू आवरता आले नाही.

काजल विनोद जयस्वाल (वय ३०) व परी उर्फ वैभवलक्ष्मी विनोद जयस्वाल (वय चार) अशी मृतांची नावे आहेत. महिला ही नऊ महिन्यांची गर्भवती होती. पती विनोद हे सकाळी धामणगाव (देव) येथे मुंगसाजी महाराज यांच्या दर्शनासाठी गेले होते. महिलेने स्वयंपाकासाठी गॅस पेटविताच सिलिंडरने भडका घेतला. सिलिंडरचा स्फोट झाल्याने घरातील वस्तूंनी भडका घेतला. त्यात मायलेकींचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आगीत घर व घरासमोरील उंबराचे झाडही भस्मसात झाले. अग्निशमन दलाचे बंब येण्यापूर्वी नागरिकांनी बोअरवेलच्या पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र, मायलेकींना वाचविण्यात यश आले नाही. आगीत होरपळल्याने काजल ७५ टक्के तर चिमुकली परी ५५ टक्के भाजल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. चिमुकल्या परीला वाचविण्याचा आईने आटोकाट प्रयत्न केला. अखेरच्या श्‍वासापर्यंत परीला आईने आपल्यापासून दूर सोडले नाही.

घटनेची माहिती मिळताच पारवा पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार गजानन शेजूळकर, जमादार हेमतसिंग राठोड यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. शवविच्छेदनानंतर मायलेकीवर शोकाकूल वातावरणात आयता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पती गेले होते देवदर्शनासाठी

आपले कुटुंब सुखरूप राहावे, यासाठी पती विनोद जयस्वाल हे पदयात्रेत सहभागी होऊन दारव्हा तालुक्यातील धामणगाव (देव) येथे मुंगसाजी माऊलींच्या दर्शनासाठी गेलेले होते. त्यामुळे घरी मायलेकीच होत्या. जयस्वाल धामणगाव येथे पोहोचत नाही तोच त्यांच्या घरी ही दुर्दैवी घटना घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()