सुशांत.. तू एवढ्या लवकर जायला नको होतं

Dear Sushant, its too early..
Dear Sushant, its too early..
Updated on

सुशांत,
कॉलेजातून डिग्री
घेऊन निघतांना
तुझं वाक्‍य आम्ही
हृदयात कोरून ठेवलेलं
"तुम्हारा रिझल्ट तय नही करेंगा,
की तुम लुझर हो या विनर,
तुम्हारी कोशीश तय करेगी!
आणि तूच!
सुशांत अरे,
थोडी कोशीस केली असती...
लुझर होण्याआधी!
-अभिजित डाखोरे

अभिजित डाखोरे हिंगणघाटचा युवा संवेदनशील कवी. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येची बातमी कळताच तो खूपच व्यथित झाला. त्याला राहावले नाही आणि त्याच्या संवेदनशील लेखनीतून सुशांतसोबत संवाद करणारी ही कविता उतरली. सुशांतच्या अवचित जाण्याने संवेदनशील मने कोलमडून पडली आहेत...अनेकांनी आपल्या मनातील स्पंदने टिपायली सुरूवात केली आहे. अशीच काही हळहळणारी वैदर्भी मनोगते...

आयुष्य खरच इतकं स्वस्त आहे का? ....अभिजित फाळके (सामाजिक कार्यकर्ते, वर्धा)

मला आज खरंच काही सुचत नाहीये. मी निशब्द आहे. इतका प्रतिभासंपन्न, इतका हुशार कलाकार वयाच्या 34 व्या वर्षी स्वःताचे आयुष्य अशाप्रकारे संपवितो हे माझ्या तरी आकलनापलीकडले आहे. मला नवा पिढीतील हा चेहरा खरच खूप आश्वासक वाटायचा. सुशांतचे बहुतांश चित्रपट मी अतिशय गांभीर्याने बघितले. त्याच्या चेहऱ्यावरची करुणा आणि अभिनयातला सहजभाव मला अपील करायचा. मला त्याच्यात भावी सुपरस्टार दिसायचा. आज माझ्यासारखी कितीतरी रसिकांची मन मोडली असतील. एका मोठ्या कलाकाराचे असे जाणे नामंजूर. मला आज सर्वांना एकच प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येकाचा आपला एक संघर्ष असतो, व्यथा असतात, अडचणी असतात, प्रश्न असतात. पण मित्रानो, आयुष्य खरचं इतके स्वस्त आहे?

सुशांत,असा का निघून गेलास?....पराग मगर (जनसंपर्क अधिकारी, सर्च संस्था)

त्याचा छिचोरे सहा ते सात वेळा पाहिला. अपयशाला घाबरून आत्महत्या करू पाहणाऱ्या आपल्या मुलाला प्रेमाने समाजवणारा बाप. आयुष्य असच असत. सगळेच "लूजर्स' असतात हे उलगडून सांगणारा.. आणि आज त्याच्याच आत्महत्येची बातमी...आजच्या पिढीचा एक समंजस अभिनेता. त्याला अनेक भूमिका करताना पहायचं होतं. "सोनचीडिया' चित्रपटाबद्दल काहीच दिवसांपूर्वी कुणाशी तरी बोललो. तो पाहायचा राहून गेला होता. मालिकांमधून आलेला आणि बॉलिवूडमध्ये पाय घट्ट रोवून उभा झालेला ऍक्‍टर म्हणून नेहमी त्याला सॅल्यूट ठोकला मी. पद्मावत चित्रपटाच्या वेळी करणी सेनेने राजपूत समाजाविषयी रान उठविले असताना त्याचा निषेध म्हणून आपल्या नावातून राजपूत शब्दच काढून टाकण्याची हिम्मत त्याने दाखवली. तरीही...डिप्रेशन शब्दाची देखील आता भीती वाटत आहे...

आयुष्य इतकं स्वस्त असतं का?...तेजस्वीनी बारब्दे पाटील

जगताना अडचणी येतातच. बरेचदा माणूस या अडचणी बघून तुटूनही जातो. पण म्हणून काय जीव द्यायचा? ज्या निसर्गाने जन्माला घातलं, त्या निसर्गाच्या परवानगीशिवाय आयुष्य संपविण्याचा आपल्याला अधिकार नाहीय. संकटं, अडचणी आल्या तर लढायचं बळ असतंच की जवळ. लढणं सोडून मरण का जवळ करायचं? डप्रेशन आलंय तर व्यक्त व्हावं कुणाजवळ.. भकाभका बोलून टाकावं जे वाटतं ते आणि मोकळं व्हावं. असं "इन्ट्रोव्हर्ट' राहण्यात काय अर्थय?
सुशांत.. तुझं जाणं रियली नॉट ऍक्‍सेप्टेड

बुद्ध ने कहा है, आपका शरीर तो रहताही है

अशी अनेक स्पंदने सोशल मीडियावर उमटत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील "दगान'कार कवी किशोर कवठे यांनी तर " पवित्र रिश्‍ता..
मी वेळात वेळ काढून बघायचो...विनम्र यार...' या अत्यंत मोजक्‍या शब्दात आलल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. तर मुळचे विदर्भादी असलेले आणि आता मुंबईत बडे अधिकारी असलेले प्रदीप ढोबळे यांनी गौतम बुद्धाचे तत्वज्ञान सांगत आपली संवेदना मांडली आहे. ते म्हणतात, महात्मा बुद्ध ने कहा आपका सब कुछ खोने के बाद भी आपके पास एक चीज रहती है, आपका शरीर. इस शरीर से आप फिर दुनिया बसा सकते हो.

किशोर तिवारीही व्यक्त झाले

ज्यांनी शेतकरी आत्महत्या अगदी जवळून पाहिल्या आहेत आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी प्रत्यक्ष काम केले आहे, असे सामाजिक कार्यकर्ते किशोर तिवारी यांनीही आपल्या संवेदना मांडल्या. ते म्हणतात, जास्त दिवस लॉकडाउन ठेवले तर डिप्रेशनमध्ये जाणारे आत्महतय करतात. कारण आर्थिक, राजकीय, सामाजिक लौकिकाची, पदाची अस्तित्वाची चिंता एकट्यात जास्त दाट होते. असे बरेच कोरोनाचे बळी जगात लवकर जास्तच दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.