आई-वडील जेवण करून झोपले, गॅलरीत मुली पाळण्यावर झोके घेत असताना लागला गळफास

Death of a little girl by strangulation
Death of a little girl by strangulation
Updated on

नागपूर : लॉकडाउन व उन्हामुळे लहान मुलांचे घराबाहेर निघणे बंद झाले आहे. त्यामुळे घरातल्या घरात खेळून मुलं वेळ घालवत आहेत. आई-वडीलही घरातच असतात. मात्र, दुपारची वेळ ही झोपण्याची. आई-वडील झोपी गेल्यानंतर तीन बहिणी गॅलरीत खेळत होत्या. तसेच पाळण्यावर झोका घेत होत्या. अशात एकीच्या गळ्यात दोरी अडकली आणि अनुचित घडना घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दूल वसीम हे पत्नी व तीन मुलींसह हसनबागेतील मशिदीजवळ राहतात. त्यांचा लोखंडी आलमारी बनविण्याचा मोठा कारखाना आहे. मात्र, लॉकडाउनमुळे सर्वकाही बंद आहे. अत्यावश्‍यक सेवेत आलमारीचे दुकान येत नसल्याने अब्दूल यांना दुकान उघडता येत नाही. त्यामुळे ते घरीच राहतात.

दुपारी कुटुंबीयांनी जेवण केले आणि झोपी गेले. मात्र, लहान असल्याने फातिमा ही दोन्ही बहिणींसह गॅलरीतील पाळण्यावर झोके घेत होती. फातिमा पाळण्यात बसली होती तर दोघी बहिणी तिला झोके देत होत्या. उंच झोका गेल्यानंतर फातिमाचा तोल गेल्याने दोन्ही हात सुटले. त्यामुळे पाळणा उलटला आणि नॉयलॉन दोर तिच्या गळ्याभोवती आवळल्या गेला. 

तिच्या दोन्ही बहिणी घाबरल्या आणि गळफास काढण्याचा प्रयत्न करीत होत्या. दरम्यान, तिचा काका झोपेतून उठून बाहेर आला. त्याला हा प्रकार दिसला. त्याने लगेच फातिमाच्या गळ्याचा फास काढला आणि कुटुंबाच्या मदतीने मेडिकलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी फातिमाला मृत घोषित केले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

आई-वडील झोपले अन्‌...

लॉकडाउनमुळे सर्वकाही बंद आहे. हाताला काम नाही. दुकान उघडता येत नाही. त्यामुळे घरीच राहावे लागत आहे. यामुळे जेवण गेल्यानंतर सर्वांचा वेळ झोपण्यातच जात असतो. मात्र, लाहन मुलं खेळण्यात गुंग असतात. यामुळे मुलांकडे आई-वडिलांचे दुर्लक्ष होते. अशाच एका प्रकरणात घरच्या गॅलरीत खेळताना मुलीचा दोरीचा फास गळ्याभोवती आवळल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी हसनबामध्ये उघडकीस आली.

यापूर्वीही मुलाचा मृत्यू

लॉकडाउन सुरू झाल्यानंतर एका मुलाचा घरीच गळफास लागून मृत्यू झाला होता. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर फक्‍त जीवनावश्‍यक वस्तूंचीच दुकाने सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी किराणा दुकान असणाऱ्या पतीच्या मदतीसाठी पत्नी दुकानात गेली होती. यावेळी मुलगा घरी एकटाच होता. तो नॉयलॉनची दोरी बांधून झोका घेत होता. झोका घेताना दोरीचा फास गळ्याभोवती लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. आई-वडील घरी आल्यानंतर ही बाब उघडकीस आली होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.