नागपूरात कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

दिवसभरात २८४ नव्या बाधितांची भर
Death of corona patient in Nagpur
Death of corona patient in Nagpur
Updated on

नागपूर - कोरोना पुन्हा झपाट्याने हातपाय पसरतो आहे. दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मृत्यूवर नियंत्रण मिळवले होते. मात्र रुग्णालयात बाधितांची संख्या वाढत असल्याने मृत्यूचा धोका वाढला. दरम्यान शनिवारी (ता. २३) बाधिताचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. यामुळे नागपूरकरांमध्ये धडकी भरली आहे. दररोज रुग्णसंख्येत गतीने वाढ होत आहे. बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचा टक्का कमी झाल्याने सक्रिय बाधित वाढत आहेत. जिल्ह्यात एकाच दिवशी २८४ नव्या बाधितांची भर शनिवारी पडली. यामुळे मागील दीडशे दिवसानंतर सक्रिय बाधितांची संख्या दीड हजारावर गेली आहे.

जिल्ह्यात या कोरोनाबाधिताची अद्याप नोंद झाली नसली तरी मेडिकलच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात या मृत्यूची नोंद आहे. दगावलेली ४२ वर्षीय महिला असून ती यवतमाळ जिल्ह्यातील आहे. कोरोनाच्या लक्षणासह इतरही बऱ्याच व्याधी असल्याने ती गंभीरावस्थेत होती. एका खासगी रुग्णालयात हलवले होते. येथे ॲन्टिजन चाचणीत कोरोना असल्याचे निदान झाले. त्यानंतर मेडिकलमध्ये हलवले गेले. तिच्यावर मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना २१ जुलै रोजी मृत्यू झाला.

जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रकोप थांबला होता. तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येपेक्षा सध्या जास्त रुग्ण आढळत आहेत. यामुळे कोरोनाची दहशत वाढली आहे. जिल्ह्यात दहा रुग्ण शिल्लक होते. परंतु बाधितांची संख्या प्रचंड वाढली आहे. जिल्ह्यात १९ फेब्रुवारी २०२२ रोजी १५३० इतके सक्रिय रुग्ण होते. त्यानंतर म्हणजेच जवळपास १५५ दिवसानंतर (शनिवार २३ जुलै) सक्रिय रुग्णसंख्या १५२७ वर पोहचली आहे. यात शहरातील १०३४ आणि ग्रामीणमधील ४९३ रुग्णांचा समावेश आहे.

६५ बाधित रुग्णालयात

सध्या जिल्ह्यात ६५ जणांना मध्यम व तीव्र अशी लक्षणे आहेत. मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहे. तर लक्षणे नसलेले १४६२ जण गृहविलगीकरणात आहेत. दिवसभरात १२३ आणि ग्रामीणमधून ५१ असे केवळ १७४ जणांनी कोरोनावर मात केली. शनिवारी शहरात १७७५ आणि ग्रामीणमध्ये ८४० अशा जिल्ह्यात २६१५ चाचण्या झाल्या. त्यापैकी २८४ जणांचे अहवाल बाधित आढळले. यात शहरातील १८८ आणि ग्रामीणमधील ९६ बाधितांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.