"बातमी आईला देऊ नका''; प्रेमभंग झाल्याने प्रशिक्षणार्थी महिला पोलिसानं उचललं टोकाचं पाऊल..

प्रशिक्षणार्थी महिला पोलिस (Women Police) कर्मचाऱ्याने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Women Police
Women Policeesakal
Updated on
Summary

तिचे एका युवकाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रेमाच्या आणाभाका घेत असताना, युवकाने अचानक दुसऱ्याशी लग्न केले.

नागपूर : प्रेमभंग झाल्याने पोलिस प्रशिक्षण केंद्रातील (RPTS) प्रशिक्षणार्थी महिला पोलिस (Women Police) कर्मचाऱ्याने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपुर्वी तिने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने केलेल्या आत्महत्येची माहिती आईला देऊ नका, असे नमूद केल्याने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडालीये. ही घटना मंगळवारी (ता. ९) सकाळी उघडकीस आली.

प्रतिक्षा भोसले (वय २६, रा. पुणे) असे मृत प्रशिक्षणार्थी महिला पोलिसाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे लग्न झाले असून पतीशी फारकत घेतली होती. फेब्रुवारी महिन्यात ती पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणास (Police Training Center) आली होती. दरम्यान, तीचे एका युवकाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. प्रेमाच्या आणाभाका घेत असताना, युवकाने अचानक दुसऱ्याशी लग्न केले.

Women Police
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला, तीच ही वाघ नखे आहेत का? अरविंद सावंतांचा सवाल

ही बाब प्रतिक्षाला कळताच, तिला जबर मानसिक धक्का बसला. त्यामुळे तिने मंगळवारी (ता. ९) पहाटेच्या सुमारास महिलांच्या वसतिगृहाच्या वरच्या माळ्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या शिडीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास तिच्या खोलीत राहणाऱ्या दोन सहकारी महिला पोलिसांना ती आढळून आली नाही.

मात्र, तिने लिहिलेली चिठ्ठी टेबलावर दिसली. ती बघताच, त्यांनी याबाबतची माहिती प्रशिक्षण केंद्रातील प्रमुखांना दिली. त्यांनी प्रतिक्षाच शोध घेतला असता, ती वरच्या माळ्यावर गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. याची सूचना बजाजनगर पोलिसांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करीत, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठविला. तिचे वडील मजुरीचे काम करीत असून तिच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com