नागपूर जिल्हयातील एकमेव या ‘हॉटस्पॉट’ तालुक्यात आतापर्यंतची मृत्यूसंख्या ४२...

file
file
Updated on

कामठी (जि.नागपूर) : जिल्हयातील ‘या’ तालुक्यात केवळ दोन दिवसात ३५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून तालुक्याची रूग्णसंख्या आता एक हजार ८८ तर मृत्यूसंख्या ४२ वर पोहोचली आहे. आज ६३ रुग्णांनी कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले. आजपर्यंत तब्बल ८१३ बाधीत रुग्णांनी कोरोनावर मात करत कामठी तालुका प्रशासनाला सुखद दिलासा दिला. दुसरीकडे १७ जुलैपासून सतत एकामागे एक ४२ जणांचा मृत्यू झाल्याने नागरिकात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 पुन्हा ३५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर
कामठी तालुक्यात बाधीत रुग्णांची संख्या ग्रामीण भागात मोठ्या झपाट्याने वाढत असून  मागील एक आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला.  दोन दिवसात पुन्हा ३५ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून  यात ग्रामीण भागातील नऊमध्ये खसाळा तीन, बिडगाव व घोरपड प्रत्येकी दोन तर येरखेडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच शहरातील विविध भागातील सव्वीस रुग्णांचा समावेश असून यात सर्वाधिक मोंढा सहा, कसार ओली व खलाशी लाईन येथे प्रयेकी चार, बजरंग पार्क तीनसह शहरातील विविध भागातील रुग्णांचा समावेश आहे. शहरासह आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनासह सारीच्या आजाराने सुद्धा हातपाय पसरल्यामुळे मृतांची संख्या जलद गतीने वाढत आहे. मागील १७ जुलै पासून अवघ्या एकोणतीस दिवसात १८ महिला व २४ पुरुष असे सतत एकामागे एक ४२ जणांचा मृत्यू झाला असून त्यात शहरातील विविध भागातील २६, ग्रामीण भागातील १३ यात सर्वाधिक येरखेडा येथील सात आहेत तर छावणी परीषद क्षेत्रातील तिघांचा मृत्यू झाला आहे. यातील तब्बल २८ व्यक्ती पन्नास वर्षांवरील आहेत.

मोठी बातमी: राष्ट्रवादीच्या या खासदाराचे भाजपमध्ये गेलेल्यांच्या घरवापसीबद्दल मोठे व्यक्तव्य.. म्हणाले…

जलालखेडा येथे एकाची दिवशी मिळाले १२ रुग्ण
जलालखेडाः आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या जलालखेडा येथे १५ ऑगस्टला कोरोनाचे एकाच दिवशी १२  रुग्ण सापडल्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यामध्ये एकाच परिवारातले १० तर इतर२ असे एकूण१२ रुग्ण मिळाले. तहसीलदार, पटवारी, ग्रामविकास अधिकारी, सरपंचांनी त्या भागाची पाहणी करून तो परिसर  सील केला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने गावकऱ्यांना सुरक्षित  राहण्याचे आवाहन केले. सर्व बाधित रुग्णांना होमक्वारनटाईन करण्यात आले आहे. तसेच संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना घराबाहेर न निघण्याचे निर्देश देण्यात आले आहे. संपर्कातील सर्वांची तपासणी केली जात आहे.

अधिक वाचाः कोरोनाचा हाहाकार! नागुरात १६ दिवसात तब्बल ३३९ रुग्णांचा मृत्यू.. आज तब्बल इतक्या रुग्णांची नोंद.. वाचा
 

कन्हान परिसरात ६ मृत्यू
कन्हान : कोरोना रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असून आज परिसरात एकूण १७ रूग्ण आढळले. पारशिवनी तालुक्यात आतापर्यंत एकूण २१७ एवढी रूग्णसंख्या झाली आहे. शनिवारी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्रीला ६५ लोकांची रॅपेट तपासणी करण्यात आली. यात कन्हान ३, कांद्री ५, टेकाडी कोळसा खदान नं. ६ चा १ असे ९ असे रुग्ण आढळले. आतापर्यंत कन्हान परिसरात एकूण ६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

edited by: vijayKumar raut

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.