दहावीच्या मूल्यांकनाचा निर्णय चुकीचाच; शिक्षकांची प्रतिक्रिया

दहावीच्या मूल्यांकनाचा निर्णय चुकीचाच; शिक्षकांची प्रतिक्रिया
Updated on

नागपूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द (Cancelation of 10th exam) करीत त्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे मूल्यांकन (10th result) करण्यासाठी पद्धती देण्याची घोषणा केली. मात्र, या निर्णयाला शिक्षक समुदायातूनच विरोध होताना दिसून येत आहे. या पद्धतीऐवजी विद्यार्थ्यांची बारावीप्रमाणे अभ्यासक्रमात कपात करुन परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. (Decision of Assessment of 10th results is wrong said teachers community)

दहावीच्या मूल्यांकनाचा निर्णय चुकीचाच; शिक्षकांची प्रतिक्रिया
नागपूर महापालिका करणार नागरिकांच्या आरोग्यावर केवळ २ टक्के खर्च

शिक्षणमंत्र्यांनी नुकतेच एका पत्रकार परिषदेमध्ये दहावीचे मूल्यांकनासाठी ९ वीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचे ५० गुण, दहावीच्या अंतर्गत मूल्यांकनाचे २० तर दहावीच्या सत्र परीक्षांचे ३० गुण असा एकूण १०० गुणांवर गुणपत्रिका देण्याची पद्धत दिली आहे. मात्र, या पद्धतीवर शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या मते ही पद्धत चुकीची असल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे यानुसार मूल्यांकन कसे करायचे असा प्रश्न उपस्थित केला आहे. पुरुषोत्तम पंचभाई यांनी, या पद्धतीने अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याची भीती व्यक्त केली आहे. याशिवाय प्रा. सपन नेहरोत्रा यांनीही बारावीप्रमाणे दहावीची परीक्षा घेता येणे शक्य असताना, सरकारने अशाप्रकारे गुणदान करणे अयोग्य असून न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच अशाप्रकारे पद्धतीची घोषणा का केली असा प्रश्न उपस्थित केला आहे. याशिवाय योगेश बन यांनीही सरकारकडून घेण्यात आलेला निर्णय चुकीचा असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अनिल शिवणकर यांनीही कायदेशीर बाबी सुटायच्या असताना, शालेय शिक्षण विभागाने घाई का केली? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच अनिल गोतमारे यांनीही सरकारचा निर्णय आततायीपणाचा असून अकरावीप्रमाणे दहावीतही सीईटी घेता आली असती, अशी प्रतिक्रिया दिली.

पालकांकडूनही विरोध

बारावीप्रमाणेच दहावीची परीक्षा घेता आली असती. केवळ त्यासाठी विद्यार्थ्यांना थोडा वेळ द्यायला हवा होता. एकीकडे अंतर्गत मूल्यमापन करीत, अकरावी प्रवेशासाठी सीईटी घेण्यात येत आहे. त्यापेक्षा दहावीची परीक्षा घेणे सोपे झाले असते. त्यामुळे या पद्धतीला पालकांनीही विरोध केला असल्याचे दिसून येत आहे.

इयत्ता ९ वी च्या निकालावर ५० पैकी गुणदान योग्य वाटत नाही. ९ वी चा निकाल हा वस्तुनिष्ठ आणि परिपूर्ण नाही. कारण मागील वर्षी व्दितीय सत्र परीक्षा झाल्या नाहीत. प्रथम सत्र आणि अंतर्गत मूल्यमापन (१००+२०) याआधारे १२० पैकी गुणांच्या आधारे इयत्ता ९ वी चा निकाल देण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी गुणदान झाले. त्यामुळे निकाल कमी लागण्याची शक्यता आहे.
-पुरुषोत्तम पंचभाई, शिक्षक
न्यायालयाच्या निकालापूर्वी अशा प्रकारचा निर्णय घेणे घाईचे ठरेल. ज्याअर्थी बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहे, त्याप्रमाणे दहावीच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी अभ्यासक्रम कमी करण्यात यावा.
-प्रा. सपन नेहरोत्रा.
दहावीच्या मूल्यांकनाचा निर्णय चुकीचाच; शिक्षकांची प्रतिक्रिया
उपराजधानीत पेट्रोलनं गाठली शंभरी; महागाईचाही उडणार भडका

(Decision of Assessment of 10th results is wrong said teachers community)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()