सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कर्मचारी भडकले, हे आहे कारण...

Deduction from salaries of contract employees in super specialties
Deduction from salaries of contract employees in super specialties
Updated on

नागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीवर असलेले मदतनीस आणि शिपाई यांच्या वेतनातून संबंधित कंपनीने 500 रुपयांची कपात केली. आधीच वेतन कमी त्यात आणखी पाचशे रुपयांची कपात केल्याने कंत्राटी कामगार संतप्त झाले आणि कंपनीचा निषेध करीत सुपरमध्ये चार ते पाच तास आंदोलन पुकारले. यामुळे सकाळी सुपरची व्यवस्था विस्कळित झाली. काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

सुपर स्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये रिक्त पदे न भरता कंपनीमार्फत चतुर्थ श्रेणीची पदे आऊटसोर्सिंगद्वारे भरण्यात येत आहेत. कंत्राटी पद्धतीवर कामावर काही कामगारांना घेण्यात आले. या कर्मचाऱ्यांना अल्प वेतन देण्यात येते. सध्या 60 कामगार सुपरमध्ये कार्यरत आहेत. या कामगारांच्या वेतनातून प्रत्येकी 500 रुपये कपात करण्यात आली. यामुळे कामगार भडकले. अवघ्या पाच ते सात हजार रुपयात महिनाभर या कर्मचाऱ्यांना खासगी कंपनीमार्फत राबवून घेण्यात येत आहेत.

याच कामगारांच्या भरोशावर सुपर स्पेशालिटीच्या स्वच्छतेचा डोलारा आहे. मात्र, याकडे साफ दुर्लक्ष करून अन्याय करण्यात येत असल्याची तक्रार या कर्मचाऱ्यांनी केली. सुपरच्या प्रशासनाकडून संबंधित कंपनीला वेतन दिल्यावर कंपनीमार्फत या कामगारांचे वेतन होते. कामगार रुग्णालयाच्या आवारात निदर्शने करीत होती. हे नियमाला धरून नसल्याने या कामगारांना रुग्णालय परिसर सोडून रस्त्यावर जावे असा निरोप पाठवला. यामुळे कामगार अधिकच संतप्त झाले आणि यातून तणावाची स्थिती निर्माण झाली.

कंपनीविरुद्ध निदर्शने


सुपर स्पेशालिटीत मदतनीस, शिपाई, तंत्रज्ञांनी सोमवारी सकाळी 8 वाजता काम बंद केले. रुग्णालयाच्या आवारात सर्व कर्मचारी गोळा झाले. प्रशासनाच्या तसेच कंपनीविरुद्ध निदर्शने केली. विशेष कार्य अधिकाऱ्यांचे कार्यालय गाठले असता, सुपर स्पेशालिटीकडून वेतन अदा करण्यात आले. यामुळे हा प्रश्‍न सुपर प्रशासनाचा नसून संबंधित कंपनीशी संपर्क साधण्याचा सल्ला यावेळी त्यांनी दिला.

लवकरच मिळेल कपात केलेली रक्कम?

दरम्यान, संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याने येत्या दोन दिवसांत त्यांची कपात केलेली रक्कम मिळणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर दुपारी हे कामगार कामावर परतले. यासंदर्भात विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.