Local Artist : बहुरूपी कलेचा रंगमंच कोराच ; व्यथा झाली कथा ,मुलांना नोकरीत सामावून घेण्याची मागणी

प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतो. मनोरंजन ही एक कला आहे. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. कलावंतांमध्ये सुप्त गुण असतात.
Local Artist
Local Artistsakal
Updated on

सडक अर्जुनी : प्रत्येक माणूस आपापल्या कलेत निपुण असतो. मनोरंजन ही एक कला आहे. कलेसाठी कलावंताला जन्म घ्यावा लागतो. कलावंतांमध्ये सुप्त गुण असतात. त्या सुप्त गुणातून कलावंत इतरांची मने जिंकतो. त्यातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहही चालतो. अशाच मनोरंजनातून समाजप्रबोधन करणारे बहुरूपी समाजातील कलावंत आहेत. परंतु, हल्ली समाज व शासनाकडून अश्रय मिळेनासा झाल्याने या कलावंतांची दयनीय अवस्था झाली आहे.

बहुरूपी समाजाज वंशपरंपरेनुसार बहुरूपी विविध लोकांचे सोंग घेऊन कला प्रदर्शित करून पोट भरतात. परंतु, आमच्या मुलांनी आमच्यासारखे होऊ नये. शिकलेल्या मुलांना शासनाने नोकरी द्यावी अशी अपेक्षा आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली, वांगी, सिंदीपार (बिररी), प्रतापगड आणि भंडारा जिल्ह्यातील चारगाव येथे बहुरूपी कुटुंबे आहेत.

या कुटुंबातील व्यक्ती विविध रूप धारण करून भूमिका वठवितात. सलवार घालून कॉलेज कुमारीका, सुंदर साडी घालून गृहिणी, गरोदर स्वी, पोलिस, डॉक्टर, लैला मजनू, शंकर-पार्वती, हनुमान, राम- सीता, दारुडांची रूपे धारण करतात. लोकांच्या नजरा आपल्याकडे वेधून मनोरंजन करतात. त्या माध्यमातून मिळणाऱ्या अल्प मिळकतीतून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

Local Artist
Gondia Crime News : लैंगिक अत्याचारानंतर अल्पवयीन मुलीची हत्या; गोंदियाच्या गोठणपार येथील घटना

एका दिवसाला ५० ते ६० रुपये कमाई होते. त्यामध्ये मेकपचे सामान, सोंग तयार करण्यासाठी कपडे खरेदी आणि कुटुंबाचा गाडा चालवितात. त्यांना वंशपरंपरेने ही कला अवगत असली तरी, तिला उदरनिर्वाहाचे साधन बनविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विशेष म्हणजे या समाजात महिलांना मात्र, बहुरुप्यांचे सोंग करण्यास मञ्जाव आहे.

फक्त पुरुष मंडळी ही कला प्रदर्शित करतात. ते भटकी जमातीमध्ये येत असून आर्थिक परिस्थितीमुळे मुले जास्त शिकत नाहीत. शिकली तर नोकरी नाही. अशा परिस्थितीत जीवन कसे जगावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. समाजातील माणसे उन्हाळ्यामध्ये होळीच्या नंतर नागपूर, अकोला, अमरावती, धुळे, रांची, पाटणा, रायपूर, बिलासपूर, अंबिकापूर, जगदलपूर आदी ठिकाणी जातात. पावसाळ्यात थोडीफार मजुरी करतात आणि दिवाळीनंतर गावाकडेच आपली कला प्रदर्शित करतात.

उल्लेखनीय म्हणजे सौंदड रेल्वे फाटकाजवळ काही बहुरुपी युवक, वृद्ध विविध वेशभूषा करून ट्रक चालकांना थांबवून त्यांच्याकडून मदत मागताना दिसतात. तसेच जवळच्या बाजारात आणि गावात घरोघरी जाऊन मदत मागताना निदर्शनास येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.