नागपूर : आरटीओतील दलालाला धमकी देत, त्याच्याकडून खंडणीची मागणी करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराला सदर पोलिसांनी गुरुवारी दुपारी सापळा रचून रंगेहात पकडले. या घटनेने पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे. धनराज उर्फ टिटू साधू राम शर्मा (वय ५५, रा. बाबा दीप सिंगनगर, सुगतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.