नागपूर : कोरोनाचे संकट पूर्णपणे संपले नसताना नागरिकांपुढे आता डेंगींचे आव्हान उभे ठाकले आहे. जिल्ह्यात ६७२ रुग्ण आढळले असून, ६ जणांचा मृत्यू झाला आहे. शहराच्या अनेक भागात आजही कित्येक नागरिक तापाने फणफणत आहेत. डेंगी पाय पसरत असल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. पूर्व विदर्भातील एकूण रुग्णांची संख्या पाहता नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत.
पूर्व विदर्भात तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यांची तपासणी केली असता त्यात डेंगीचे रुग्ण सर्वाधिक सापडत आहेत. नागपूर जिल्ह्यात आठवडाभरात शहरात १७५ तर ग्रामीण भागात ७९ डेंगीचे रुग्ण आढळून आले. यामुळे आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात डेंगीचे ६७२ रुग्ण आढळून आले आहेत.
पूर्व विदर्भात १ जानेवारी २०२१ ते १२ ऑगस्ट २०२१ या साडेसात महिन्यांच्या काळात २०२० च्या तुलनेत ७ पटीने डेंगीचे रुग्ण वाढले आहेत. सातत्याने डेंगीच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. नागपूर विभागात एकूण १ हजार २२ डेंगीग्रस्तांची नोंद झाली तर ९ जणांचा बळी गेला.
फवारणीला अद्याप गती नाही
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोरोना नियंत्रणासाठी जी ठोस पावले उचलण्यात आली, ती डेंगीवर नियंत्रण आणण्यासाठी उचलण्यात आलेली दिसत नाही. कोरोनाच्या साथीमुळे तसेच दहशतीमुळे संबंधित विभागाचे कीटकनाशक फवारणीकडे दुर्लक्ष झाले. मात्र, संबंधित यंत्रणा हे मानण्यात तयार होत नसल्याच दिसून येते.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पूर्व विदर्भात वाढलेले डेंगीग्रस्त
१ जानेवारी २०२० ते जुलै २०२०
१३० डेंगीचे रुग्ण आणि २ मृत्यू
१ जानेवारी २०२१ ते जुलै २०२०
१,०२२ डेंगीचे रुग्ण आणि ९ मृत्यू
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.