मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन शिथिल करण्याची हिंमत दाखवावी : देवेंद्र फडणवीस

devendra fadanvis challenged uddhav thackrey over lockdown
devendra fadanvis challenged uddhav thackrey over lockdown
Updated on

नागपूर : करोनाविरोधात लढाई सुरूच ठेवावी लागणार आहे. सोबतच राज्याचा आर्थिक गाडा सुरळीत करण्यासाठी महाआघाडी सरकारला हिंमत दाखवून लॉकडाऊनसुद्धा शिथिल करावे लागणार आहे. अन्यथा राज्याची अर्थव्यवस्था ढेपाळायला वेळ लागणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

विविध माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत फडणवीस यांनी ऑनालाईन चर्चा केली. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्‍यक असल्याचे सांगितले. जर करोनाच्या भीतीने बचावात्मक धोरण स्वीकारले, तर राज्याची अर्थव्यवस्थाच धोक्‍यात येईल. सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपण उद्योग, व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत चर्चा करण्याचा आग्रह केला होता.

सर्वच क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा करून काही नियमावली तयार केली जाऊन आणि छोटे,मोठे व्यवसाय, उद्योग सुरू करावे लागणार आहे. सुमारे दीड महिन्यांपासून जवळपास सर्वच व्यवसाय ठप्प आहेत. रोजगार बंद झाले आहेत. सातत्याने लॉकडाऊन वाढविला तर याचा उद्रेक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

उद्योगांना प्रोत्साहन द्या

देशपातळीवर सरकारी यंत्रणेला करोनाशी लढण्यास एक आराखडा तयार केला जात आहे. हॉटस्पॉट आणि कंटोनमेंट झोन सील करण्यात आले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळत आहे. हे लक्षात घेता करोनाचा प्रभाव नसलेल्या भागात लॉकडाऊन शिथिल करून जनजीवन हळूहळू सुरळीत करण्याची आवश्‍यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मोजक्‍या रेल्वे गाड्या सुरू करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. त्यावरून देशातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा विश्‍वास निर्माण होऊ लागला आहे.

करोनासोबतचा लढा दीर्घकाळ करावा लागणार आहे. सोबत जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या गराजाही पूर्ण कराव्या लागणार आहे. कामगार कायदाच्या माध्यमातून श्रमिकांचे रक्षण करतानाच उद्योग-व्यवसाय कसे अडचणीतून बाहेर येतील याचाही विचार करण्याची आता आवश्‍यकता आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेसुद्धा सकारात्मक पावले उचलावे.

चीनमधील अनेक उद्योजक महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहेत. पाच वर्षे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्याने बऱ्याच गोष्टी आणि बारकावे आपणास माहिती आहेत. गरज फक्त इच्छाशक्तीची आहे पैशाची नाही. सरकारने फक्त पीएलएफ फंडावर लक्ष दिले तरी राज्याला मोठी आर्थिक मदत मिळू शकते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.