नागपूर - गेल्या पाच वर्षांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चल संपत्तीत ११ लाखांची वाढ झाली आहे. तर त्यांच्याकडे फक्त २३ हजारांची रोख रोकड आहे. तर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे १० हजार रुपये रोख आहेत..फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्याकडे ५६ लाख ७ हजार रुपयांची चल संपत्ती आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी हा आकडा ४५ लाख ९४ हजार दाखवला होता. आयोगाला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ४ कोटी ६८ लाखांची अचल संपत्ती आहे. तर त्यांच्या पत्नीकडे ९५ हजारांची अचल मालमत्ता आहे.फडणवीस यांच्याकडे चार बॅंक खात्यात २ लाख २८ हजार ७६० रुपये आहेत. मागील निवडणूक काळात त्यांच्या खात्यात ८ लाख २९ हजार रुपये होते. त्यांच्या पत्नीचे पाच बॅंकांत खाते असून त्यात १ लाख ४३ हजार रुपये आहेत. मागील निवडणूक काळात त्यांच्याकडे ३ लाख ३७ हजार असल्याचे दाखविण्यात आले होते. पाच वर्षात दोघांच्या बॅक खात्यातील रक्कम कमी झाल्याचे आकडेवारीवरून लक्षात येते..अमृता फडणवीस यांनी शेअर व म्युच्युअल फंडामध्ये ५ कोटी ६२ लाख ५९ हजारांची गुंतवणूक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एलआयसी, पोस्टात २० लाख ७० हजारांची गुंतवणूक केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ३२ लाख ८५ हजारांचे सोने आहे. तर त्यांची पत्नी अमृता यांच्याकडे ६५ लाख ७० हजार रुपयांचे सोने आहे..अमृता फडणवीस यांच्यावर ६२ लाखांचे कर्जदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात वडिलोपार्जित शेती आहे. धरमपेठमध्ये ५,५०० चौरस फुटाची जागा असून बांधकाम केले आहे. तर अमृता फडणवीस यांच्याकडे हजारी पहाड येथे एक सदनिका आहे. अमृता फडणवीस यांच्यावर ६२ लाखांचे कर्ज आहे.बॅक खात्यांत २ लाख २८ हजारकेवळ २३ हजारांची रोकड#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.