Nagpur News : देवेंद्र फडणवीस लागले कामाला!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाचे भूमिपूजन लवकरच
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis metting sakal
Updated on

नागपूर : लोकसभेचे निकाल लागले. चार-पाच महिन्यानंतर विधानसभा लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय झाले आहेत.

नागपूर जिल्‍ह्यातील विविध रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा त्यांनी बुधवारी मुंबईत घेतला. प्रकल्पांसाठी आवश्यक निधी देण्याचे आश्वासन देत ते लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई येथे झालेल्या बैठकीत शहरातील विविध प्रकल्प आणि विकासकामांवरही चर्चा झाली. नागपुरातील ६१५ खाटांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे भूमिपूजन लवकरच होणार असून, वाठोडा येथील हॉस्पिटलचे काम सुद्धा तत्काळ सुरू करा, असेही निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कामासाठी ६० कोटी रुपये तत्काळ देण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले. आरोग्याच्या बाबतीत निधीची तरतूद करा, यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

बैठकीला महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आणि नासुप्र सभापती संजय मीना उपस्थित होते. तीनही अधिकाऱ्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून रखडलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. त्याच प्रमाणे त्यांच्यासाठी आवश्यक निधीची मागणी केली.

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी मेयो, मेडिकलमधील कामांसाठी ६३९ कोटींचा आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगितले. यासाठी काही निधी देण्यात आला असून उर्वरित ५०७ कोटी रुपयांचा निधी तत्काळ देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

स्मार्ट सिटी अंतर्गत मौजा भरतवाडा, पुनापूर येथील विटभट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या. इंदोरा येथील जागेवर सिंधू आर्ट गॅलरीचे बांधकाम ही तातडीने सुरू करून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सूचित केले.

Devendra Fadnavis
Nagpur News : नागरिकांचा माजी नगरसेवकाला चोप; हुडकेश्वर परिसरात घरात पावसाचे पाणी शिरल्याने नाराजी

बैठकीस उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, प्रधान सचिव गोविंदराज, मदत व पुनर्वसन

विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी आदी उपस्थित होते.

या प्रकल्पांचा घेतला आढावा

  • श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी

  • महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था

  • सीताबर्डी येथे रिसर्च सेंटर

  • ओबीसी भवन, अजनी

  • संत सावतामाळी भवन

  • शिवसृष्टी, टेकडी गणपती तीर्थक्षेत्र

  • बख्त बुलंदशाह स्मारक सौंदर्यीकरण

वाठोडा येथे ३०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे कर्करोग उपचाराच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीसंवर्धन अंतर्गत बांधकाम प्रगतीपथावर असून ते तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जात आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या जागेवर वाठोडा येथे तीनशे खाटांच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामही गतीने पूर्ण करण्यात यावे, असे उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले.

Devendra Fadnavis
Nagapur : वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार, साई किशोर, राहुल चहर नेट गोलंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.