नागपूर - प्राचीन काळापासून धनत्रयोदशी आणि दिवाळीला सोने खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या एक दिवसापूर्वी सोन्याच्या दरात किंचित घट झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. आज आणि उद्या असे दोन दिवस धनत्रयोदशीचा मुहूर्त आल्याने २०० किलो सोने तर १५० किलो चांदीची खरेदी होईल असा अंदाज आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ही २० टक्के वाढ आहे. अंदाजे ३५० कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.