Diabetes Patients : कोरोनामध्ये मधुमेहींना इम्स्ट प्रो देणार बुस्ट

कोरोना काळात मधुमेहींना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. अनेकांचा यामुळे मृत्यू झाला.
Corona News
Corona Newsesakal
Updated on
Summary

कोरोना काळात मधुमेहींना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. अनेकांचा यामुळे मृत्यू झाला.

नागपूर - कोरोना काळात मधुमेहींना मोठ्या प्रमाणात त्रास झाला. अनेकांचा यामुळे मृत्यू झाला. मात्र, आता सीएसआयआरच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसोर्स टेक्नाॅलाआजी पालमपूर यांनी स्टिव्हीयाच्या माध्यमातून कोरानाशी लढताना इम्युनिटी वाढविण्यासाठी स्टिव्हीया लिव्हज चा वापर करीत, तयार केलेले इम्स्ट प्रो बुस्ट देणारे ठरणार आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. विशेष म्हणजे कोरोनाचा सर्वाधिक त्रास हा मधुमेही आणि हृदयविकार असलेल्यांना झाला. अनेकांना कोरोनाच्या लाटेत मृत्यू झाला. कोरोनात रुग्णाची इम्युनिटी कमी होत असल्याने मधुमेहींना त्याचा मोठ्या प्रमाणात त्राास होत असल्याचे दिसून आले. त्यातूनच त्यांच्यावर उपचार करताना प्रथम मधुमेह नियंत्रणात आणून त्यानंतर इतर उपचार करावे लागतात.

मात्र, अशावेळी रुग्णाची प्रकृती खालावते. त्यामुळे अशा रुग्णांची इम्युनिटी वाढविणे आवश्यक असते. त्यातूनच सीएसआयआर च्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोसोर्स टेक्नाॅलाआजी पालमपूर यांनी स्टिव्हीया झाडाच्या पानाचा वापर करीत, त्यांनी इम्स्ट प्रो हे उत्पादन तयार केले. या उत्पादनातून त्यांनी मधुमेही आणि सामान्य व्यक्तींनाही आरोग्यदायी ठरणारे आहे. यावेळी याबाबत माहिती देताना डॉ. सुखजिंदर सिंग म्हणाले, स्टिव्हीया हे मधुमेहींसाठी उत्तम असल्याने त्याचा आधार घेत, हे उत्पादन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे याचा फायदा रुग्णांची इम्युनिटी वाढविण्यात करता येते.

क्रिस्पीफु़ड

संस्थेच्या वतीने विविध फळांना त्यांतील कुठलेही तत्त्व न घालविता क्रिस्पी करण्यात आले आहे. यामध्ये आंबा, सफरचंद, केळ आणि इतर फळांचा समावेश करण्यात आला आहे. साधारणतः हे करीत असताना त्यातील मुळ तत्त्व कमी होताना दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.